बोंडगावदेवी : तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतवर काँग्रेस समर्थित पॅनलने निर्विवाद ताबा मिळविला. सरपंचपदी लक्ष्मीकांत नाकाडे तर उपसरपंचपदी उज्ज्वला डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नऊ सदस्य असलेल्या माहुरकुडा गट ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित पॅलनचे लक्ष्मीकांत नाकाडे, उज्ज्वला डोंगरे, संघदीप भैसारे, अनिल दशरथ कापगते, नलू पुरुषोत्तम नाकाडे, अल्का जागेश्वर पंधरे हे सहा सदस्य सरपंच-उपसरपंच निवडणुकीदरम्यान सभेला हजर होते. तर मालकनपूर येथील निवडून आलेले तीन सदस्य सभेला गैरहजर होते. सरपंचपदासाठी लक्ष्मीकांत नाकाडे व उपसरपंच पदासाठी उज्ज्वला डोंगरे यांचा एकमेव अर्ज सादर करण्यात आला. एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज नसल्याने सरपंचपदी लक्ष्मीकांत नाकाडे तर उपसरपंचपदी उज्ज्वला डोंगरे यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून नवेगावबांधचे मंडळ अधिकारी म्हणून एम.के. मेश्राम यांनी काम पाहिले. सहकारी म्हणून तलाठी सुरेन मारगाये, सभेच्या कार्यवाहीचे कामकाज ग्रामसेवक कांबळे यांनी सांभाळले.