सायकल रॅलीला आ. कोरोटे यांच्या भवनातून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली श्री अग्रसेन चौक, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून भ्रमण करीत मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत देवरीच्या तहसील कार्यालय परिसरात पोहोचली. इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी व महागाई नियंत्रणात आणण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार विजय बोरुडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष उषा शहारे, तालुका अध्यक्ष सुभद्रा अगडे, माजी जि. प. सदस्य माधुरी कुंभरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शकील कुरैशी, शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, जयपाल प्रधान, छगनलाल मुंगनकर, सरपंच नूतन बन्सोड, ओमकार शाहू, प्रल्हाद सलामे, शार्दूल संगीडवार, संदीप मोहबीया, राजेश गहाणे, राजा भाटीया, प्रशांत कोटांगले, अमित तरजुले, अरुण जमदाळ, नरेश राऊत, सुरेंद्र बंसोड, कमलेश पालीवाल यांच्यासह देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:34 AM