शिष्टमंडळात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी आमदार दिलीप बंसोड, गप्पू गुप्ता, इंजि. राजीव ठकरेले, राजकुमार पटले, डोमेश चौरागडे, प्रदीप सहारे, मुकेश बरईकर, सुरेश कावळे होते. बुद्ध विहाराचे बांधकाम मागील २ वर्षांपासून रेंगाळत ठेवून स्थानिक ग्रामपंचायत तसेच त्यांच्या कंत्राटदारांनी बौद्ध समाजाला अंधारात ठेवले. हा येथील बौद्ध समाजावर झालेला मोठा अन्याय आहे. त्यामुळे मोरवाही येथील बौद्ध समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे, असे मत यावेळी शिष्टमंडळाने मांडले. आपण हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे व बांधकाम विभागाकडे उचलून धरू व निश्चितच बौद्ध बांधवांना न्याय मिळवून देण्यास मदत करू, असे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने आंदोलनकर्त्यांना दिले. याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते तसेच आंदोलनकर्ते व बौद्धबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरवाही येथील आंदोलनाला काँग्रेस शिष्टमंडळाची भेट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:34 AM