लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कर्ज माफी व पीक कर्ज याबाबत शासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही. त्यासोबतच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी व आपल्या इतर मागण्यांना घेऊन शेतकरी व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या काळात केवळ १२ हजार कोटींची कर्जमाफी केल्याने सर्व शेतकºयांना त्याचा फायदा झाला. त्यावेळी कोणतेही निकष थोपले गेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री लाखो रुपयांची जाहिरात करून ३६ हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचे ढोल वाजवित आहेत. यात कर्जमाफी व पिक विम्यासाठी आॅनलाईनची अट घातली आहे. १०० किमी. अंतरावरुन तालुकास्थळी येणाºया शेतकºयांना नेटचे सर्वर बंद असल्याने आल्यापावली परत जावे लागत आहे. पीक विम्याचेही तेच हाल आहे. शासनाजवळ सर्व कर्जाची आकडेवारी असतानाही नाटके कशासाठी? असा सवाल उपस्थित करून या गोष्टी सर्वसामान्य व शेतकरी वर्गाने समजून घ्याव्या. ही राज्य व केंद्राची सरकार सर्वसामान्य व शेतकºयांची नाही तर लबाडांची आहे, असे ते शेतकरी टॅÑक्टर मोर्चात म्हणाले.मोर्चात उपस्थित शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी, सन २०१५-१६ चा दुष्काळ निधी, धानाला तीन हजार रुपये बोनस, सर्वांच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये मिळाले का, असे प्रश्न विचारले. यावर सर्वांनी ‘नाही’ अशी सामूहिक घोषणा केली.यानंतर कोरोटे पुढे म्हणाले, असे मोठेमोठे वादे करून, खोटे बोलून सत्ता मिळविली. मात्र सत्ता मिळताच शेतकरी व सर्वसामान्य लोकांना वाºयावर सोडले. आता पावसानेसुद्धा दगा दिल्याने विदर्भ व मराठवाड्यात दुष्काळाची गडद छाया आहे. अशा परिस्थितीत सरकार कर्जमाफी दिल्याचा प्रचार करीत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकºयांच्या हातात अजूनपर्यंत एक दमडीसुद्धा दिली नाही. या सरकारला शेतकरी व सर्वसामान्य लोकांशी काहीही देणे-घेणे नाही. हे फक्त व्यापाºयांचे सरकार आहे आणि गोड बोलून सत्ता मिळविणाºया दगाबाजांचे सरकार आहे. तरी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सत्ता काबीज करणाºयांना धडा शिकविण्यासाठी वेळ आली आहे, असे ते म्हणाले.मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांना देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार बी.टी. यावलकर यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने ३० आॅगस्टपर्यंत हे क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करा, सन २०१५-१६ मध्ये दुष्काळ घोषित गावातील शेतकºयांना त्वरित मोबदला द्या, शेतकºयांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्या, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करा, अशा विविध मागण्यांचा यात समावेश आहे.याप्रसंगी मोर्चात गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी आमदार रामरतन राऊत, लोकसभेचे युवक काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन मिसपिरीचे उपसरपंच जीवनलाल सलामे यांनी केले. आभार तालुका महामंत्री बळीराम कोटवार यांनी मानले.मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी पुढाकार घेतला. जि.प. सदस्य दिपकसिंह पवार, माधुरी कुंभरे, उपसभापती संगीता भेलावे, ओमराज बहेकार, माणिक आचले, कैलास घासले, रमेश नागदेवे, छन्नुलाल उईके, छगनलाल मुंगनकर, बळीराम कोटवार, संदीप भाटीया, जीवन सलामे, सोनू नेताम, राजाराम सलामे, चैतराम पटले, राजू झिंगरे व सुरेंद्र बन्सोड यांच्यासोबत संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना प्रत्यक्ष भेटून राज्य व केंद्र सरकाराचे ध्येयधोरण याविषयी माहिती देवून लोकांना जागृत केले आणि ट्रॅक्टर मोर्चात मोठ्या संख्येने लोकांना येण्यास परावृत्त केले.
काँग्रेसचा शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 9:43 PM
कर्ज माफी व पीक कर्ज याबाबत शासनाने घातलेल्या अटींची पूर्तता करणे शेतकºयांना परवडण्यासारखे नाही.
ठळक मुद्देफक्त व्यापाºयांचे सरकार : कटरे व कोरोटे यांनी घेतला पुढाकार