आॅनलाईन लोकमतगोंदिया : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. याच उद्देशातून आम्ही ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तर यातूनच काँग्रेसने देशातील सर्वांना नि:शुल्क आरोग्य सेवेचा अधिकार दिल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम एकोडी येथे आयोजीत आरोग्य निदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, आरोग्य सेवेसाठी केलेल्या कामांत सर्वात मोठे यश म्हणजे, गोंदियात शासकीय मेडीकल कॉलेजची स्थापना आहे. येथे किमान शुल्कावर विद्यार्थ्यांना प्रवेश तर मिळणारच शिवाय ५०० खाटांच्या दवाखान्यात सर्वच प्रकारच्या उपचारांची व्यवस्था असणार असे सांगीतले. जिल्हा परिषद सभापती पी.जी.कटरे यांनी, पूर्ण राज्यात गोंदिया जिल्हा असा राहिला की जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची स्थापना झाली असे सांगीतले.पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून त्यांची सोडवणूक करणे हे लोकप्रतिनिधींचे काम असून आमदार अग्रवाल आपले काम पूर्ण इमानदारीने करतात असे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पातूरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे, प्रकाश रहमतकर, ओमप्र्रकाश भक्तवर्ती, अर्जुन नागपूरे, रूद्रसेन खांडेकर, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, रमेश अंबुले, सिमा मडावी, शेखर पटेल, स्नेहा गौतम, चमन बिसेन, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, प्रमिला करचाल, आनंद तुरकर, आशिष चव्हाण व अन्य उपस्थित होते.रूग्णांची विविध प्रकारची तपासणीया शिबिरातील शेकडो रूग्णांची ईसीजी, रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, दंतरोग, चर्मरोग यासह गरोदर माता, कुपोषीत बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
काँग्रेसने दिला नि:शुल्क आरोग्य सेवेचा अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:14 PM
आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. याच उद्देशातून आम्ही ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : एकोडी येथील आरोग्य तपासणी शिबिर