कपिल केकत, गोंदिया : शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावती येथे महात्मा गांधी व त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन केलेल्या वक्तव्याचा येथील कॉँग्रेस सेवादलने निषेध नोंदविला. तसेच येथील गांधी प्रतिमा चौकात शनिवारी (दि.२९) भिडे यांच्या छायाचित्रावर जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
गुरुवारी अमरावती येथे भिडे यांनी महात्मा गांधी व त्यांच्या आई-वडिलांवर अभद्र टिप्पणी केली. तसेच महात्मा गांधी यांना मुस्लिम धर्मीय असल्याचे व ते लव्ह जिहादला समर्थन करीत असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा येथील कॉँग्रेस सेवादलने निषेध नोंदविला. तसेच शनिवारी गांधी प्रतिमा चौकात निदर्शन करून भिडे यांच्या छायाचित्राला जोडे मारले. शिवाय, भिडेंना लवकरात लवकर अटक करून कारवाईची मागणी राज्य शासनाकडे केली. याप्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव अमर वराडे, सेवादल जिल्हाध्यक्ष राजीव ठकरेले, एनएसयूआई जिल्हाध्यक्ष हरीश तुलसकर, शहर महासचिव आलोक मोहंती, तालुका महासचिव रंजीत गणवीर, ओबीसी विभाग जिल्हा महासचिव जीवन शरणागत, दिलीप गौतम, मोहित राहंगडाले, रवि रिनायत, मनीष चव्हाण, मंथन नंदेश्वर, सुनील भुंगाडे, दीपेश अरोरा, दीपक उके, चित्रा लोखंडे रूपाली ऊके आदी कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.