शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

महागाई विरोधात काँग्रेस-रॉकाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 9:42 PM

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. तर शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका बसत आहे. मात्र यानंतरही मन की बात करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व सामान्य जनतेची महागाईमुळे होत असलेली होरपळ दिसत नाही.

ठळक मुद्देभारत बंदला जिल्ह्यात उत्सफूर्त प्रतिसाद : मोटारसायकल रॅली काढून पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध, सर्वसामान्य जनतेत रोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहे. तर शेतकऱ्यांना सुध्दा याचा फटका बसत आहे. मात्र यानंतरही मन की बात करणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व सामान्य जनतेची महागाईमुळे होत असलेली होरपळ दिसत नाही. त्यामुळे केवळ मन की नव्हे तर मोदी यांनी जन बात करण्याची गरज असल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केली. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सोमवारी (दि.१०) भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा देत हा बंद यशस्वी करण्यासाठी शहरात रॅली काढली. तसेच नेहरु चौकात निदर्शने केली. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाल चौक येथून खा.मधुकर कुकडे यांच्या नेतृत्त्वात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरुन नेहरु चौकात पोहचली. रॅलीत सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. तसेच महागाईच्या दर नियंत्रणात ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा प्रभाव सर्वच वस्तूंवर झाला आहे. शेतकºयांना सुध्दा याचा फटका बसला असून त्यांना शेती करणे कठीण झाले आहे. तर सर्व सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून त्यांची आर्थि कोंडी झाली आहे. महागाईमुळे जनता त्रस्त असताना मोदी सरकार मात्र अद्यापही जनतेला खोटी आश्वासने देत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध नोंदविला. तसेच जीवनाश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. या वेळी काढण्यात आलेल्या रॅलीत माजी. आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, माजी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, अशोक गुप्ता, अशोक सहारे, शिवकुमार शर्मा, मनोहर चंद्रिकापुरे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे,केतन तुरकर, बालकृष्ण पटले, शैलेश वासनिक, सोनू रॉय, जितेश टेंभरे,मनोहर वालदे, जगदीश बहेकार, राजेश दवे, जयंत कछवाह,खालीद पठाण, गणेश बरडे, जनकराज गुप्ता, आशा पाटील, कैलास पटले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.गोरेगाव : महागाईला विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. याला गोरेगाव तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व भाकपाने या दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उपस्थित नसल्याचे ठाणेदार सचिन थोरात यांना देण्यात आले. या वेळी पी. जी. कटरे, झामसिंह बघेले, हौसलाल रहांगडाले, परेश दुरु गकर, लक्ष्मण चंद्रिकापुरे, कल्पना डोंगरे, योगराज वडगाये, डेमेंद्र रहांगडाले,जगदिश येरोला, देवचंद कुंभलकर,खिरीचंद येडे, नारायण शेंडे, उत्तम चचाने, मनोज चौधरी, डॉ. रु स्तम येडे, जितेंद्र कटरे, रामभाऊ हरिणखेडे, विशाल शेंडे, गुणवंतराव नाईक,चरणदास भावे उपस्थित होते.सडक अर्जुनी: वाढत्त्या महागाई विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. याला सडक अर्जुनी तालुक्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी डॉ. अविनाश काशिवार, शेषराव गिऱ्हेपुंजे, रमेश चुटे,अशोक लंजे, देवचंद तरोणे, रामलाल राऊत, राजेश नंदागवळी, छाया चव्हाण, रजनी गिऱ्हेपुंजे, गायत्री इरले, शशीकला टेंभुर्णे, वंदना डोंगरवार, मंजू डोंगरवार, दुर्गा खोटेले उपस्थित होते.सालेकसा : तालुक्यातील विविध पक्षाच्या वतीने शहरात रॅली काढून वाढत्या महागाई व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शहरातील बस स्थानक परिसरातून मोटार सायकल रॅली माजी मंत्री भरतभाऊ यांच्या उपस्थित काढण्यात आली. त्यानंतर ही रॅली गोवारी चौक, सुभाष चौक,गांधी चौक, रेल्वे स्टेशन, वनविभाग कार्यालयात भ्रमण करित तहसील कार्यालय येथे पोहचली. येथे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. रॅलीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, मनसे आदी पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी काँग्रेस महासचिव यादनलाल बनोठे, उपाध्यक्ष लल्लन अग्रवाल, जि.प.सदस्य विजय टेकाम, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, कैलाश अग्रवाल, गजानन मेहर, निर्दोष साखरे, काशी पाथोडे, रमेश चुटे, तुकाराम बोहरे, विष्णू काशिवार, रवी चुटे, मनसे शहर अध्यक्ष राहूल हटवार, धुव्रा हुकरे, स्वप्नील बन्सोड, गोल्डी भाटीया, यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.तिरोडा : वाढती महागाई आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहित विरोधी धोरणाच्या विरोधात सोमवारी (दि.१०) भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला तिरोडा तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.तालुका काँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या विरोधात निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका काँग़्रेस कमेटीचे अध्यक्ष योगेंद्र पटले, माजी आमदार दिलीप बन्सोड, डॉ. योगेंद्र भगत, लक्ष्मी नारायण दुबे, शहर अध्यक्ष रुबिना मोतीवाला, शोभेलाल दहिकर, हुपराज जमईवार, हितेश जांभुळकर, रमेश पटले, माणिक झंझाड, गुड्डू शेख,ओमप्रकाश पटले, लेखराज हिरापुरे, धनराज पटले, प्रदीप पटले, नमेंद्रसिंह चव्हाण, शिशुपाल पटले, सिताराम बिसेन, दिलीप पटले, आनंद मलेवार, राज जगने, संतोष निनावे, ईकबाल शेख व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनगोंदिया : वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने सोमवारी (दि.१०) भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहर आणि जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात शंभर टक्के बंद यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय ने पुढाकार घेतला होता. दुपारी १२ वाजता शहीद भोला भवन येथून शांतेत मोर्चा काढून काढण्यात आला.हा मोर्चा नेहरु चौकात पोहचल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाई व केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली. या वेळी जिल्ह काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सचिव डॉ.योगेंद्र भगत, गोंदिया-भंडारा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल अग्रवाल यांनी वाढती महागाई व केंद्र सरकारच्या जनहित विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतीच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, डॉ.राधेलाल पटले,शहर काँग्रेसचे महासचिव अपूर्व अग्रवाल, अनिल कुमार गौतम, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, संदीप रहांगडाले, हरिश तुळसकर, न.प.बांधकाम सभापती शकील मन्सुरी, अमर वऱ्हाडे, सहसराम कोरोटे, मनोज पटनायक, आलोक मोहंती, सुनील तिवारी, पराग अग्रवाल, भागवत मेश्राम, व्यंकट पाथरु, चेतना पराते, अर्जुन नागपूरे, संदीप भाटीया, धनलाल ठाकरे, अरुण दुबे, चमन बिसेन, नफिस जाफर सिद्दीकी, कुमराज चव्हाण, सुशिल रहांगडाले, गोपाल कापसे, अंकित जैन, अमर रंगारी, निकेतन अंबादे, अशोक लिचडे, रंजीतकुमार गणविर, महेश माधवानी, रमेश शुक्ला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.