ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:10 PM2018-10-25T22:10:03+5:302018-10-25T22:10:24+5:30

भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे.

Congress is the only option for the OBC community | ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

ओबीसी समाजासाठी काँग्रेसच पर्याय

Next
ठळक मुद्देजितेंद्र कटरे : काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : भाजप सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केली. परिणामी ओबीसी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी घेण्यात अडचण निर्माण झाली आहे. हा भाजप सरकारचा ओबीसींना दडपण्याचा डाव आहे. त्यामुळे ओबीसी समाजाकरिता काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे यांनी केले.
तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने मंगळवारी (दि.२३) येथील दुर्गा मंदिरातील सभागृहात आयोजीत विशेष सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मलेश्याम येरोला, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, अध्यक्ष महिला चैतुरा चव्हाण, रविंद्र चन्ने, राहुल कटरे, अशोक शेंडे, योगेश पारधी, जगदीश मेश्राम, शंकर पटले, राजेंद्र तुरकर, पाडुरंग कोल्हे, रमेश वट्टी, खेमराज ठाकूर, छोटू पारधी, अनिल बघेले, अशोक रंगारी, नरेश कटरे, हंसराज चोपकर, उत्तम कटरे, सुकलाल रहांगडाले, अशोक पटले, दामोदर तुरकर, लोकेश चौधरी, रुपचंद पटले, फनिंद्र पारधी, ओमप्रकाश कोल्हे, नरेश अगळे, परमानंद मेश्राम, लिमचंद बिसेन, राजेंद्र बगळते उपस्थित होते. सभेत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कटरे यांचा तालुका काँग्रेस व तालुका महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
संचालन अशोक शेंडे यांनी केले. आभार माजी सरपंच योगेश पारधी यांनी मानले.

Web Title: Congress is the only option for the OBC community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.