लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता. यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात या मदतीत सातत्याने वाढ करण्यात आल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील नवेगाव येथे शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारामधील त्रृटी नि:शुल्क दुरूस्ती करुन नवीन सातबारा वितरण कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता.या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, बाबुलाल पटले, तहसीलदार राजेश भांडारकर, सरपंच मदन सोयाम जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुुले, प.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद तुरकर, आशिष चव्हान, जाकीर खान, विमल नागपूरे, किशोर बघेले, हनस गराडे, रेखा चिखलोंढे,चैनलाल लिल्हारे,भूमेश्वर बागडे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले धान उत्पादक शेतकऱ्यांना सातबाऱ्यातील त्रृटीमुळे जमिनीची खरेदी विक्री तसेच विविध कामात अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तर महसूल विभागाकडून यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात होती. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकऱ्यांच्या सातबारातील त्रृटी नि:शुल्क दूर करण्यासाठी शिबिर घेतले. त्यानंतर सातबारातील त्रृृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप गिरोला, पिपरटोला येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. या क्षेत्रातील जनतेच्या प्रेम आणि विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. या क्षेत्राच्या सर्वांगिन विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही यांनी त्यांनी या वेळी दिली. रमेश अंबुले यांनी आ.गोपालदास अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळेच या क्षेत्रातील जनतेच्या अनेक समस्या मार्गी लागल्या असून अनेक विकास कामे करण्यात आल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जवळपास १५०० शेतकºयांना सातबाºयातील त्रृटी दूर करुन नवीन सातबाराचे वाटप करण्यात आले.
धान उत्पादकांना मदत करण्याची पंरपरा काँग्रेसने सुरु केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:27 PM
काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच शेतकरी हितेशी राहिली आहे.धान उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची पंरपरा सर्वप्रथम काँग्रेसनेच सुरू केली.२००३ मध्ये प्रथम तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी धानाला प्रती एकर सरसकट ३०० रुपये बोनस जाहीर केला होता.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : नवेगाव येथे सातबारा वितरण कार्यक्रम