लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे बिहार, ओडिसा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन आहे. परंतु या झोनने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास छत्तीसगडच्या तुलनेत कमी केले आहे. तसेच महाराष्ट्रातील आमदार, खासदारांना जनतेच्या समस्या घेवून बिलासपूरला धाव घ्यावी लागणे एकदम उलटे ठरते. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, इतवारी आदी क्षेत्राला मध्य रेल्वे मुंबई झोनसह जोडण्यात यावे, असे निवेदन डेली रेल्वे मुव्हर्स असोसिएशन (ड्रामा) गोंदियाच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले आहे. या वेळी दिलेल्या निवेदनातून बिलासपूर झोनने महाराष्टष्ट्रातील जिल्ह्यांसोबत छत्तीगडच्या तुलनेत सावत्र व्यवहार केला जात आहे.छत्तीसगडमध्ये गेवरारोड, कोरबा, रायगड, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, डोंगरगडवरून प्रवाशी गाड्या सुरू होतात. मात्र महाराष्टÑातील इतवारी, चांदाफोर्ट, वडसा, भंडारारोड, गोंदिया या स्थानकांना झोनने मागील २० वर्षांत महाराष्टÑातून गाड्या सुरू होवू शकतील, या योग्य बनविलेच नाही.छत्तीसगडमध्ये प्रवाशी गाड्यांना जनरल मॅनेजरच्या कृपेने ५० पेक्षा जास्त स्थानकांत थांबविले जाते. परंतु गोंदियात एलटीटी पुरी, पुणे दुरंतो, मुंबई दुरंतो यांना या नियमानुसार थांबा दिला जात नाही. मागील वर्षी झोनने अनेक प्रवाशी गाड्या दुर्ग, रायपूर, बिलासपूर येथून सुरू केल्या.परंतु गोंदियाला वंचित ठेवण्यात आले. जर मध्य रेल्वे गोंदियातून विदर्भ एक्स्प्रेस चालविली जाऊ शकते व दपूम रेल्वे गोंदियातून महाराष्टÑ एक्स्प्रेस चालवू शकते तर बिलासपूर झोन दुर्ग, रायपूर येथे येवून समाप्त होणाºया बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड, लखनऊ, जगदलपूर, रायगडच्या गाड्या गोंदिया-इतवारीपर्यंत विस्तारित का करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित केला.गोंदिया रेल्वे स्थानकावर अडीच कोटी रूपये खर्च करून सुधारित स्थानकाला आणखी सुंदर बनविले जात आहे. परंतू प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी युरीनल (लघुशंका घर) बनविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एका फलाटावर दहा स्वच्छतागृह असण्याचा नियम आहे. पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. गोंदियातील जनता प्लॅटफॉर्म-१ वरून विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या परिचालनाची मागणी करीत आहे. परंतु ही मागणीसुद्धा अद्याप प्रलंबित आहे.याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मध्य रेल्वे मुंबईसह जोडण्यासाठी करण्यात आलेल्या मागणीचे समर्थन केले. तसेच यावर लवकरच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार, असे आश्वासन दिले.या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ड्रामाचे गोपाल अग्रवाल उपस्थित होते.
राज्यातील जिल्ह्यांना मध्यरेल्वे मुंबई झोनशी जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:29 PM
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे बिलासपूर झोनचे बिहार, ओडिसा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रशासन आहे. परंतु या झोनने महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास छत्तीसगडच्या तुलनेत कमी केले आहे. तसेच महाराष्ट्रातील आमदार, खासदारांना जनतेच्या समस्या घेवून बिलासपूरला धाव घ्यावी लागणे एकदम उलटे ठरते. त्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, इतवारी आदी ...
ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यांना निवेदन