ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २६०. १९६ व १०२ ची मोजणी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांसह चर्चा व परवानगी न घेता सरपंच पटले यांनी मोजणी करुन घेतल्याचा ठपका ठेवला होता. २०११-२०१५ या कालावधीत जमा झालेली रक्कम ग्रामपंचायत फंडातून केल्याचे कारण सांगून वरिष्ठांकडून मज्जाव करण्याचे निर्देश असताना सुद्धा ग्रामपंचायतीत रुजू करणे व ग्रामपंचायतच्या संगणक कक्षास स्वत:चे कुलूप लावणे, अंगणवाडी दुरुस्तीसाठी कमिटीला विश्वासात न घेता कामे आदीचा ठपका सरपंच पटले यांच्यावर ठेवण्यात आला होता. सरपंचांनी पदाचा दूर उपयोग केल्यामुळे आयुक्त मिलिंद साळवे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९१,१० नुसार अपात्र ठरविले होते. आयुक्तांच्या या आदेशाच्या विरोधात सरपंच पटले यांनी ग्रामविकास मंत्रालय व न्यायालयात अपील केली होती. त्याला स्थगिती देत पटले यांना पदावर कायम राहण्याचे आदेश दिले आहे.
खमारी येथील सरपंचाला ग्रामविकास मंत्र्यांचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:20 AM