शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

विधानसभा क्षेत्र चार, मात्र नाही एकही महिला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 4:29 PM

राजकीय पक्षांकडून महिलांशी दुजाभाव : बोलण्यासाठीच फक्त महिला राज

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे मोठाले नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत नसल्याचे जिवंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे. चार विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले असून, त्यात एकाही महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. यातून राजकीय पक्षांकडूनच महिलांसोबत दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होते.

आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. यात राजकारणही सुटलेले नाही. लोकसभा ते विधानसभा तेथेही महिला महत्त्वाची पदे भूषवित आहेत. विशेष म्हणजे, राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून, पुढील निवडणुकीत ते लागू होणार आहे. मात्र, आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून, या निवडणुकीत महिलांसोबत राजकीय पक्षांकडूनच दुजाभाव करण्यात आल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचे चेहरे आता स्पष्ट झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने आपली यादी जाहीर केली असून, त्यांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवातही केली आहे. येथे मात्र चारही विधानसभा क्षेत्रात त्यांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही. विशेष म्हणजे, भाजपने मागील निवडणुकीत पराजीत दोघांना पुन्हा संधी दिली. पण एकाही महिला उमेदवाराला संधी दिली नाही, तर काँग्रेसचीसुध्दा हीच स्थिती आहे. 

उच्च दर्जाचे राजकारण फक्त दिग्गजांच्या घराण्यापुरतेच राज्यातील राजकारणात महिलांची संख्या कमी आहे, असे काही नाही. महिलाही विधानसभेत आपले क्षेत्र गाजवत आहेत. मात्र, त्यात सामान्य स्तरावरील महिलेला संधी देण्यात आली असे क्वचितच बघावयास मिळते. लोकसभा म्हणा वा विधानसभा दिग्गज नेत्यांची मुलगी, सून, पत्नी यांनाच संधी दिली जात असल्याचे हमखास दिसून येते. महिलांसाठी फक्त स्थानिक स्तरावर राजकारण उरले आहे, तेही आरक्षणामुळे हेही येथे सांगणे गरजेचे आहे.

लाभल्या दोनच महिला आमदारजिल्ह्यात आमगाव व गोंदिया या दोन मतदार- संघाला फक्त दोन महिला आमदार लाभल्या आहेत. यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रात सन १९५७मध्ये सुशीलाताई इंगळे यांनी क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले, तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात १९७८मध्ये राजकुमारी बाजपेई यांनी क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांच्यानंतर महिलांना जिल्ह्यात संधी मिळालेली नाही. राष्ट्रीय दर्जाच्या पक्षांकडून तर तिकीट देण्यात आली नसल्याचे दिसते

टॅग्स :gondiya-acगोंदियाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४