शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

By admin | Published: May 18, 2017 12:18 AM

स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली.

किशोर : बुद्ध जयंती महोत्सव उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली. परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने हे साकार होऊ दिले नाही. ही उणीव बौद्धांनी भरुन काढावी, असे आव्हान ज्येष्ठ प्रबोधनकार इंजि. किशोर यांनी केले. येथील भीमनगरच्या मैदानावर आयोजित बुद्धजयंती महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद साखरे होते. मंचावर वन अधिकारी आनंद मेश्राम, समाज कल्याण अधिकारी राजेश रामटेके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक विलास वासनिक, प्रा. प्रिया शहारे, नरेंद्र मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी धर्मग्रंथांची ओळख पटवून देताना इंजि. किशोर पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर ख्रिश्चन धर्माचे होली बायबल, कम्युनिझमचे दास कॅपीटल आणि इस्लामचे कुराण हे पवित्र गं्रथ म्हणून ओळख आहे. धार्मिक चळवळीमध्ये जगात बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ एकच असावा. यामुळेच भारत बौद्धमय करण्याचा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा होता. त्यामुळे बौद्धांनी नैतिकतेची उपासना करावी असे सांगून बुद्धाचे आंदोलन म्हणजे क्रांती असून सामाजिक, आर्थिक परिवर्तनीय आंदोलन होय असे ते म्हणाले. यावेळी बोलतना समाजकल्याण अधिकारी रामटेके यांनी जनगणनेच्यावेळी बौद्ध लिहिण्याची विनंती केली. परंतु बौद्ध लिहिण्याबरोबरच बुद्धाची शिकवण अंगीकार करुन आचरणात आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. नागपूरच्या आॅकेस्ट्राने बुद्धगीतांचा नजराना पेश केला. यावेळी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करुन समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अध्यक्ष अरविंद साखरे यांनी मांडले. संचालन डॉ. राजेश उके यांनी केले. आभार सुनील भरने यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.जी. वाघमारे, दीपक (बाबा) वाहने, दिपक घरडे, दलेश नागदवने, ललीत गोंडाणे, एम.पी. भेलावे, आनंद बन्सोड, अ‍ॅड. एकता गणवीर, जे.सी. बागडे, अरविंद सूर्यवंशी, मिलींद पानतावने, अनिल मेश्राम, प्रविण कांबळे, विपूल उके, रोशन कावळे, सुनील गणवीर, मनोज खोब्रागडे, पंकज वासनिक, सुशील गणवीर, सुनील डोंगरे, सुनील गणवीर, कमलेश उके, राजू कडबे, स्नेहा गडपायले, सिद्धार्थ चंद्रीकापुरे, नीलम मेश्राम, नुरलाल उके, सुरेश रंगारी, राजरतन डोंगरे, संतोष डोंगरे, रत्नदीप भिमटे यांनी सहकार्य केले.