लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे सिंचन क्षमतेत काही प्रमाणात वाढ करण्यास मदत झाली. तसेच भूजल पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत झाल्याचा दावा शासनातर्फे केला जात आहे.यापाठोपाठ आता शासनाने धडक सिंचन कार्यक्रमातंर्गत रोहयोच्या माध्यमातून विहिरी बांधकाचे नियोजन केले आहे. पूर्व विदर्भात जवळपास १२ लाख हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. तर रब्बी हंगामात सुध्दा ४ लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते.मात्र यंदा सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व परतीच्या पावसाने सुध्दा दगा दिल्याने शेतकरी संकटात आले. सिंचनाअभावी शेतकºयांना रब्बी आणि उन्हाळी पीक घेता आले नाही.त्यामुळे राज्य शासनाच्या रोहयो विभागाने पूर्व विदर्भात १३ हजार विहिरी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रशासकीय खर्चासाठी ४ कोटी रुपयांची वेगळी तरतूद केली आहे. २० जून २०२० पर्यंत विहिरी बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. विशेष मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात या विभागाला यश आले नव्हते. त्यामुळे नव्याने १३ हजार विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे.
सिंचनासाठी १३ हजार विहिरींचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:14 PM
विदर्भात यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीसह उन्हाळी हंगाम सुध्दा धोक्यात आला आहे. सिंचनाच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना पिके घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे संकट काही प्रमाणात टाळण्यासाठी राज्य शासनाने पूर्व विदर्भासाठी धडक सिंचन कार्यकम्रमातंर्गत १३ हजार विहिरींचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देपूर्व विदर्भाला उद्दिष्ट : वर्षभरात करावे लागणार बांधकाम