शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 8:45 PM

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बांधकामातील साहित्य निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे. तर बंधाऱ्याचे बांधकाम करताना त्यात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी देखील घेतली जात नसल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू सिंचन विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.नाल्याच्या ठिकाणी बंधाऱ्याची भिंतज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यालगतच भिंत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी कुठून जाणार, पावसाळ्याच्या दिवसात हेच पाणी शेतकºयांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याचे बांधकाम पेटी कंत्राट पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे. या बंधाºयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास येवून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.उपसरपंचांच्या तक्रारीकडे दुर्लक्षयेथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. तर खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.बांधकामावर बालमजूरपरसवाडा येथे सुरू असलेल्या बंधारा बांधकामावर बाल मजुरांचा वापर केला जात आहे. नियमानुसार बाल कामगारांना कामावर ठेवता येत नसून याची सुध्दा तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांनी याकडे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.