लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कंत्राटदारास पत्र देवून बांधकाम अंदाजपत्रक व नियमानुसार तयार करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे.नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नेहरू चौक ते माता मंदिर चौकपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. ५०.५० लाख रूपये किंमतीचे रस्ता सिमेंटीकरणाचे काम आहे. सदर काम श्री दुर्गा कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. तर कंपनीकडून हे काम एक कंत्राटदार करीत असल्याची माहिती आहे. मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यातील माता मंदिर ते इंगळे चौकापर्यंतचे काम सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आले असून इंगळे चौक ते नेहरू चौक दरम्यानचे काम आता १०-१५ दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रक व अटी-शर्तीची उल्लघंन करून होत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे केली.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत नगर परिषद अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली असता त्यांनीही रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची कबुली नागरिकांनी दिली. यावरूनच नगर परिषद अभियंत्यांच्या पाहणी अहवालावरून कंत्राटदारास बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून देत बांधकामाची गुणवत्ता सुधारावी असे पत्र नगर परिषदेने दिल्याचे नागरिकांनी सांगीतले.नगर परिषदेतही तशा चर्चा ऐकीवात आहेत. त्यामुळे झालेल्या बांधकामाला घेऊन नगर परिषद काय पाऊल उचलते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.पावसाचे पाणी लोकांच्या घरातया रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदाराने तेथे असलेली नालीच बंद करुन टाकली आहे. शिवाय आता रस्त्याची उंची वाढली असल्याने पावसाचे पाणी खाली असलेल्या लोकांच्या घरात शिरत आहे. विशेष म्हणजे, एका बाजूची नाली बंद केली असताना दुसऱ्या बाजूच्या नालीत पाणी जावे यासाठी रस्त्याचा त्याबाजूने उतार देणे गरजेचे आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाहीे.
हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:53 PM
शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान चौक रस्त्याचे बांधकाम सुरू असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी के ल्यावर त्यांना सुद्धा तक्रारीत तथ्य आढळले. यावर मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कंत्राटदारास पत्र देवून बांधकाम अंदाजपत्रक व नियमानुसार तयार करण्याचे पत्र दिल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेने दिले कंत्राटदाराला पत्र : परिसरातील नागरिकांच्याही तक्रारी, कारवाईकडे लक्ष