लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गणित व विज्ञानातील शोध लावण्यासाठी आवश्यक बाबी, मानवी जीवन तसेच इतर जीवनसृष्टी व परिसर यावर शोधाचा परिणाम याची माहिती विद्यार्थ्याना बालपणापासून झाली तर त्याची जिज्ञासू वृत्ती वाढू शकेल, याच जिज्ञासू वृत्ती मधून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल. यातूनच जवळील ग्राम कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेत नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली.शिक्षणाधिकारी उल्हास नरड, अधिव्याख्याता राजकुमार हिवारे, समग्र शिक्षा अभियानचे दिलीप बघेले यांच्या पुढाकाराने या केंद्राची उभारणी करण्यात आली. या विज्ञान केंद्रामुळे विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक वृत्ती आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसीत करण्यास मदत होईल. शालेय अभ्यासक्रमात शिकविल्या जाणाऱ्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळेल. शाळेत नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने शनिवारी (दि.२०) शाळेला भेट देऊन त्याची पाहणी केली.त्यामध्ये ५२० शैक्षणिक साहित्यांचा अंतर्भाव आहे. १४३ इलेक्ट्रॉनिक साहित्य व बाकीचे इतर साहित्य असल्याचे सांगीतले. या समितीध्ये कार्यक्रम अधिकारी दिलीप बघेले, एस.एस.कठाणे, टॅक्नालॉजी प्राथमिक लिमीटेड नागपूरचे लॅब प्रतिनिधी अभिजीत झाडे, केंद्रप्रमुख एन.बी.कटरे, गटसमन्वयक विनोद परतेकी, विज्ञान विषयज्ञ रवि पटले यांचा समावेश असून त्यांनी तपासणी केली.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवानंद गराडे, उपसरपंच महेंद्र शहारे, मुख्याध्यापिका छाया कोसरकर, वरिष्ठ शिक्षक एल.यू.खोब्रागडे, जी.बी.सोनवाने, नरेश बडवाईक, एम.एन.चौरे, डी.आय. खोब्रागडे, विज्ञान शिक्षक एच.एस.रुद्रकार, मंजू चौधरी, के.जे.बिसेन, संगीता निनावे, वर्षा कोसरकर, पूजा चौरसिया, महेंद्र कुरंजेकर उपस्थित होते.यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी येणाºया दिवसांत या विज्ञान केंद्राचा लाभ कारंजा शाळेसोबतच जवळच्या शाळेतील विद्यार्थ्याना होणार असल्याचे मार्गदर्शन केले. संचालन एम.टी.जैतवार यांनी केले. आभार खोब्रागडे यांनी मानले.
नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 9:41 PM
गणित व विज्ञानातील शोध लावण्यासाठी आवश्यक बाबी, मानवी जीवन तसेच इतर जीवनसृष्टी व परिसर यावर शोधाचा परिणाम याची माहिती विद्यार्थ्याना बालपणापासून झाली तर त्याची जिज्ञासू वृत्ती वाढू शकेल, याच जिज्ञासू वृत्ती मधून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल. यातूनच जवळील ग्राम कारंजा येथील जिल्हा परिषद शाळेत नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात आली.
ठळक मुद्देकारंजा जिल्हा परिषद शाळा : समितीने केली तपासणी