माझी पोषण परसबाग विकास मोहीम व माझी उपजीविका समृध्दी मोहीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत ग्रामसंघाच्या संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून सर्वत्र राबविण्यात येत आहे. परसबाग लावताना तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक संतोष शहारे, प्रभाग संघ व्यवस्थापक अर्चना रामटेके, गोपाल मेश्राम, स्वराज प्रभाग संघाच्या अध्यक्षा चेतना नाकाडे, शालू बनपूरकर, धम्मक्रांती तुरकर तसेच ग्रामसंघात सहभागी असलेल्या महिलांची उपस्थिती होती.
उमेद अभियानांतर्गत अनेक महिला ग्रामसंघाशी जुळलेल्या आहेत. महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, स्वयंरोजगाराची कास धरून आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासात महिलांचा हातभार लागावा यासाठी उमेदच्यावतीने नावीन्यपूर्ण अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रभाग संघ व्यवस्थापक अर्चना रामटेके यांनी सांगितले. प्रभाग संघाला ३३८ बचत गट संलग्न असून ३ हजार ७३१ महिलांचा सहभाग असल्याचे तालुका व्यवस्थापन कक्षाच्या रीता दडमल यांनी सांगितले.