लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी मोर्चेकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेशव्दारासमोर ठिय्या देवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. भंडारा, नागपूर, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील २० ते २५ हजार ग्राहकांचा विविध चिटफंड कंपण्यांनी हडपला आहे. त्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. चिटफंड कंपन्याकडून ग्राहकांची होणारी दिशाभूल बंद करुन ग्राहकांनी विविध चिटफंड कंपन्यामध्ये गुंतविलेला पैसा परत मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तसेच मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.मोर्च्याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किशोर मेश्राम, प्रेम मांद्रे, दिनेशकुमार राणे, अरूणकुमार फुंडे, लखन कटरे, हुकेश लिल्हारे, उमेश बिसेन, तेजेवर पटले, डिलेश्वर पटले, लक्ष्मी कटरे, शोभा चौरीवार, रेवेंद्र टेंभरे, गजानन पटले, शिवकुमार पाथोडे, ज्ञानचंद बैठवार, मनोज चुटे, राजेश बडोले, ग्यानिराम डोये यांनी केले.
चिटफंड कंपन्यांविरोधात ग्राहकांचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 9:27 PM
चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता स्थानिक जे.एम.हायस्कूल छोटा पाल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
ठळक मुद्देकंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन