संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर : पं. दीनदयाल उपाध्याय विस्तारक प्रशिक्षण वर्ग लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पं दीनदयाल यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जनसंघ व विचारधारेसाठी कार्य केले. ते एक कुशल संघटक व आदर्शवादी विचारवंत राजनेते होते. त्यांनी संघटना आणि सिंद्धांताच्या पायावर राजकारण केले. एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाच्या त्यांच्या तत्वज्ञानावर भाजपा कार्य करीत आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतीय जनता पार्टी विस्तारक अभियान राबवित आहे. या अभियानात विस्तारक म्हणून ज्यांना जवाबदारी मिळाली आहे त्यांनी २९ मे ते १२ जून दरम्यान संपर्क साधायचा आहे.असे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या पं. दीनदयाल उपाध्याय विस्तारक अभियान अंतर्गत १४ मे रोजी तिरोडा तालुक्यातील बोदलकसा येथील विश्रामगृहात आयोजित विस्तारक व प्रमुख पदाधिकाधिकाऱ्यांच्या कार्यविस्तार योजनेच्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन म्हणून ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. नाना पटोले, प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास, आ.प्रा. अनिल सोले, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, संजय पुराम, खुशाल बोपचे, माजी आ.केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, भेरिसंह नागपुरे, हरीश मोरे, अनुसूचित जाती प्रदेश अध्यक्ष व जिल्हा प्रभारी सुभाष पारधी, नागपुरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर, पूर्व संघटनमंत्री आशीष वांदिले, श्रीकांत देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडा नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, जिल्हा महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाची सुरु वात भारत माता व पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी आ. व्यास यांनी विस्तारक संकल्पनेबाबद माहिती देत आपला पक्ष हा २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करतो. या अंतर्गत बूथ वरील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्याला आपली विचारधारा, शासनाच्या योजना समजावून सांगून त्यांच्या समस्या जाणून घेऊन बूथची संघटनात्मक बांधणी करायची असल्याचे सांगितले. आ. प्रा. अनिल सोले यांनी ‘पं. दीनदयाल उपाध्याय जीवन दर्शन या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंतची सखोल माहिती देत त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिवार संवाद सभा बाबत माहिती देतांना पूर्व संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे यांनी ‘कार्यविस्तार योजनेवर माहिती दिली. या कार्यविस्तार योजनेचा उद्देश असून संघटनात्मक कामासोबत समाज संपर्क, सरकारच्या योजनांबाबत माहिती देणे, स्वछता अभियानासारखे रचनात्मक कार्यक्र म घेणे, पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी योजना अंतर्गत त्यांचे चरित्र, योगदानबाबत माहिती दिली. बैठकीचे समारोप पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. संचालन जिल्हा संघटन महामंत्री वीरेंद्र अंजनकर तर आभार आ. विजय रहांगडाले यांनी मानले. बैठकीचा समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी बैठकीला प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळ, आघाडी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवा - बडोले पं दीनदयाल उपाध्याय हे एक अत्यंत साधे, निष्ठावान, ध्येयवेडे व्यक्तिमत्व होते. सामान्य माणसाचे दु:ख दूर करण्याचा त्यांनी संकल्प घेतलेला होता. त्यांच्या तत्वप्रणाली व विचारधारेला अनुसरून भाजपा कार्य करीत आहे. आमच व्यवहार हे आमच्या विचारधारेचे प्रतीक आहे. अंत्योदयाची संकल्पना त्यांनी आम्हाला दिली. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना व निर्णयामुळे समाजात क्रांतिकारक बदल घडले आहेत. समाजातील दिन, दलित शोषित, पीडित सामान्यांच्या जीवनात फार मोठा बदल घडून आला आहे. योजना गरजू लोकांपर्यंत पोहचिवण्याचे आवाहन त्यांनी केले.
बूथवरील प्रत्येक कुटुंबाशी संपर्कसाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:15 AM