लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील अनेक वर्षांपासूनची प्रवासी व तिरोडावासीयांची मागणी धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाने बेलाटी गावाच्या दिशेने उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. मालगोदामाजवळून रेल्वे ट्रॅकवरून प्रवाशांची बेधडक ये- जा सुरू असते. त्यामुळे पुलाचे काम मालगोदामाजवळ करण्याची मागणी आहे.तिरोडा रेल्वे स्थानकात मागील अनेक वर्षापासून जुने मालगोदाम आहे. तिरोड्यात कोणताही माल रेल्वेने उतरत नसल्याने ते उपयोगाचे नाही. मालगोदामाच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाखालून ट्रॅक ओलांडून प्रवाशांची सतत ये -जा सुरू असते. अधिक प्रवाशी येथूनच पायी ये-जा करतात. सद्यस्थितीत बेलाटीच्या दिशेने असलेल्या पुलाचा उपयोग फारच कमी होते. यामुळे नवीन पादचारी पूल मालगोदामाच्या बाजूनेच तयार करण्यात यावे व बुकिंग आॅफिसही तेथेच तयार करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. प्लॅटफॉर्म-१ वर थांबलेल्या गाड्यांमधील प्रवासी बेधडक ट्रॅक ओलांडून मालगोदामाजवळून शहराच्या दिशेने निघून जातात. तर प्लॅटफॉर्म-१ व २ वर शहरातून जाणारे प्रवासी तिथूनच ट्रॅक ओलांडून रेल्वे स्थानकात येतात. हा प्रकार जीवावर बेतणारा आहे. जेथे जास्त गरज आहे तिथे पूल तयार न करता रेल्वे प्रशासनाने प्रस्तावित केलेली जागा अयोग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.यासंदर्भात तिरोडा रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक शामल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सुरू असलेले पुलाचे काम सेप्टीच्या दृष्टीने योग्य ठिकाणी होत आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या मोजमापानुसार ते योग्य ते स्थानकाच्या मध्यभागी होत आहे. तिसऱ्या ट्रॅकच्या कामासाठी जुने उड्डाण पूल तोडावे लागेल. तेव्हा हे नवीन पूल उपयोगी ठरेल. तिरोडा शहरवासीयांची मालगोदामाजवळ पूल व बुकिंग आॅफिस तयार करण्याची मागणी आहे. ती वरिष्ठांना कळविण्यात आली, असे त्यांनी सांगितले. तिरोडा स्थानकात मालगोदामाजवळ दुसऱ्या उड्डाण पुलाची मागणी असतानाच ती मंजूर कधी होईल किंवा नाही, याची हमी नाही. त्यामुळे नागरिकांची व प्रवाशांची सुविधा लक्षात घेवून सध्या सुरू असलेले पुलाचे बांधकाम थांबवून ते मालगोदामाजवळच करण्यात यावे. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंकडून येणाºया-जाणाऱ्या नागरिकांना व प्रवाशांची सुविधा होईल, अशी मागणी आहे.उपयोगी नसलेले मालगोदाम पाडातिरोड्यात रेल्वेद्वारे कोणताही माल येत नाही. अनेक वर्षापासून केरकचरा व झुडुपांमध्ये असलेले जुने मालगोदाम नेहमीच बंद असते. हे मालगोदाम कोणत्याही कामासाठी उपयोगी नसल्यामुळे ते पाडण्यात यावे.शहराच्या बाजूने फलाटावर प्रतीक्षालय (वेटिंग हॉल) नसल्यामुळे मालगोदाम पाडून प्रवासी प्रतीक्षालय तयार करण्यात यावे. तसेच त्याला लागून शहराच्या दिशने पादचारी पूल व बुकिंग आॅफिस तयार करावे. तसेच हनुमान मंदिराजवळून वयोवृद्ध व अपंग प्रवाशांना येण्या-जाण्याची सोय व्हावी, यासाठी पादचारी रस्ता तयार करावा, अशी मागणी तिरोडावासीयांनी केली आहे.मालगोदामाजवळ नवीन पूल व बुकिंग कार्यालय बनविण्यात यावे. त्यामुळे शहरातून रेल्वेस्थानकात व तहसील कार्यालयाकडून रेल्वे स्थानक व शहराकडे येणे-जाणे प्रवाशांना व नागरिकांना अधिक सोयीचे होईल.प्रा. संजय जगणे, तिरोडा.बेलाटीच्या दिशने तयार होणारे पूल गैरसोईचे आहे. प्रवासी गाड्या आल्यावर तेथे वर्दळ होते. दुचाकी वाहन काढणे कठीण असते. चारचाकी वाहन वळूच शकत नाही.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुलासाठी जागेचे मोजमाप करावे.निशांत बन्सोड, तिरोडा.मालगोदामाजवळ पूल तयार करण्यात यावे. एसटी बसचा लाभ रेल्वे प्रवाशांना इतरत्र जाण्यासाठी मिळू शकते. प्रस्तावित जागेवर पूल तयार झाल्यास मालगोदामाजवळील ट्रॅकवरून बेधडक ये-जा सुरू राहील. त्यामुळे टॅÑकवर बळी जाणार नाहीप्रशांत तिरपुडे, तिरोडा.
ट्रॅकवरून ये-जा करणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:11 PM
मागील अनेक वर्षांपासूनची प्रवासी व तिरोडावासीयांची मागणी धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाने बेलाटी गावाच्या दिशेने उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध केला आहे. मालगोदामाजवळून रेल्वे ट्रॅकवरून प्रवाशांची बेधडक ये- जा सुरू असते.
ठळक मुद्देजीवितहानीचा धोका : तिरोडा रेल्वेस्थानकात पुलाचे काम अयोग्य ठिकाणी