लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आमगाव खुर्द येथे पूर्णपणे दारुबंदी लागू करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून गावातील महिला व पुरुषांनी उपोषण सुरू केले आहे.येथील तहसील कार्यालयासमोर १६ आॅक्टोबरपासून दारुबंदीसाठी साखळी आमरण उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाचा आजचा आजचा सहावा दिवस आहे. अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधीनी या उपोषणाला भेट दिली आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आला नाही. जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.उपोषणामुळे अनेकांची प्रकृती बिगडत आहे. आतापर्यंत कामुना देशमुख, मनोज शिवणकर, उषा ब्राम्हणकर यांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांवर डॉ. अभिषेक चांद यांच्या देखरेखीत उपचार सुरु आहे. उपोषण कर्त्यांमध्ये विमल कटरे, अनिता चुटे, कामुना देशमुख, लीला शेंडे, उषा ब्राम्हणकर, बेबी कठाणे, निता वशिष्ठ, वर्षा साखरे यांचा समावेश आहे.दोन दिवसात काढणार समस्येवर तोडगाराजकुमार बडोले : उपोषण मंडपाला भेटलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि.२२) सालेकसा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी वेळ काढून तहसील कार्यालय परिसरात उपोषण मंडपाला भेट दिली व उपोषणकर्त्या महिलांची मागणी ऐकून घेतली. या वेळी लगेच त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनी वरुन संपर्क साधला आणि येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्याचा आदेश दिला. तसे आश्वासनही पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्या महिलांना दिले. या वेळी नीता वशिष्ठ, शोभा पाथोडे, उषा ब्राम्हणकर, अनिता चुटे, वर्षा साखरे, सेवंता कठाणे, बेबी कठाणे, स्वाती गाढवे, सिंधू कठाणे, मीना शिवणकर, कौशल्या कठाणे, गीता ब्राम्हणकर, वैशाली कोटांगले, विमला निनावे, गवरा भोयर, भागन भलावी, वमीता राऊत, इमला गायकवाड, आशा बहेकार, सुलोचना कवरे, पुष्पा डोये आदी महिला उपस्थित होत्या.
दारुबंदीसाठी साखळी आमरण उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 9:39 PM
आमगाव खुर्द येथे पूर्णपणे दारुबंदी लागू करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून गावातील महिला व पुरुषांनी उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देउपोषणाचा सहावा दिवस : महिलांची प्रकृती खालावली, जिल्हा प्रशासनाचे उपोषणाकडे दुर्लक्ष