शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सालेकसा तालुक्यात संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 5:00 AM

धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्यान पुलावर खूप मोठया प्रमाणावर वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला दिसून आला.

ठळक मुद्देपुजारीटोलाचे १२ गेट उघडले : तालुक्यातील अनेक मार्ग अवरुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गुरुवारपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदि नाल्यांना पूर आला असून ठिकठिकाणी पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसून आला.दीर्घ प्रतिक्षेनंतर मागील १० दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत आहे. मात्र मागील २ दिवसांपासून पावसाचा जोर खुपच वाढला असून सर्वत्र मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे एकीकडे रोवणीची कामे आटोपण्याच्या वाटेवर असून दुसरीकडे तालुक्यातील छोटे मोठे तलाव तुडुंब भरण्याच्या वाटेवर आले आहेत. दरम्यान तालुक्यातील पूजारीटोला, कालीसरार व बेवारटोला धरणात सुद्धा पुरेपुर जलसाठा जमा झालेला आहे. पुढे आणखी पाऊस मोठया प्रमाणात येण्याची शक्यता पाहून पाटबंधारे विभागाने पुजारीटोला धरणाचे १२ गेट उघडले आहे.धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्यान पुलावर खूप मोठया प्रमाणावर वेगाने पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला दिसून आला. याशिवाय भजेपार-सालेकसा, भजेपार- साखरीटोला, अंजोरा-भजेपार, सावंगी/धानोली मार्ग पूर्णपणे बंद झाले.दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही सारखा मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांना आपल्या घराबाहेर निघणे सुद्धा कठीण झाले. दरम्यान तहसील कार्यालयाचे अनेक कर्मचारी आणि तलाठी यांनी विविध ठिकाणी भेट देवून पुरग्रस्त क्षेत्रात परिस्थितीचा आढावा घेतला. वाघनदीला पूर वाढत चालल्यामुळे आमगाव-सालेकसाला जोडणाºया राज्य मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी ओलांडताना दिसून आला. रोंढा नाल्यावर सुद्धा पुलावर पाणी पोहोचलेले दिसून आले. त्यामुळे अनेक लोकांनी आपली आवश्यक कामे रद्द केली. सतत पाऊस पडणे सुरु राहिल्यास सर्व मुख्यमार्ग अवरुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांचीही पडझड झालेली आहे.त्या पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारापुजारीटोला धरणाचे १२ गेट उघडण्यात आल्यामुळे वाघनदीला पूर आला आहे. तसेच धरणानंतर ही अनेक लहान मोठे नाले वाघनदीला जाऊन मिळतात. त्यामुळे वाघनदीला पुराचे प्रमाण आणखी वाढल्याने नदी काठावरील गावांना धोका वाढला आहे. अशात त्या पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा महसूल विभागाकडून देण्यात आला आहे. यात वाघनदीच्या काठावर असलेल्या ढिवरटोला, तिरखेडी, भजियापार, बोदलबोडी, नदीटोला, दरबडा, धानोली, म्हशीटोला, केहरीटोला, झालीया, साकरीटोला या गावांचा समावेश आहे. पूर्वी वाघ नदीच्या तीरावरील गल्लाटोला, लोधीटोला, चिंगुलीटोला, खेडोर, कुंभारटोला, पठाणटोला, नवेगाव, पोवारीटोला आणि कुआढास नाल्यालगत घोनसी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर