लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.वनविभागाच्या वतीने पाण्याची टंचाई व भिषणता लक्षात घेता जंगलाशेजारी नव्याने वनतलाव निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. गावाजवळील अररतोंडी येथील नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर यांनी गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गावाशेजारी दोन वनतलाव निर्मितीसाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनविभागाच्या वतीने दोन वनतलावाना मंजुरी मिळाली. यावर ५० लाखांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.या वेळी सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर, क्षेत्र सहाय्यक धुर्वे, बीट गार्ड भुरे, वनसमिती अध्यक्ष चोपराम शिवणकर, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र रहेले, संतोष खोटेले, आशा मुनेश्वर, अनिता बहेकार, सत्वशीला कोसरे, मिनाक्षी कांबळे, खादीश्वर कोरे, यादव बागडे, गुलशन रहेले उपस्थित होते.गावात होणाºया दोन वनतलावाच्या बांधकामामुळे गावातील ३०० मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. दोन्ही कामावर ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. जंगल परिसरात निर्माण होणाºया वनतलावामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची सोय होऊन गावात होणारा उपद्रवही कमी होईल.
वनतलावाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:40 PM
वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.
ठळक मुद्दे३०० मजुरांना रोजगार : रोहयो व वनविभागाचा उपक्रम