गोंदिया : महाराष्ट्रातील संपर्क १०२ रुग्णवाहिका वाहन चालकांचा मे. अशोकाम प्रा. लि. कंपनी भोपाळकडील कंत्राट ३० जुलै २०२१ रोजी संपुष्टात आला आहे. तरी १०२ रुग्णवाहिका वाहन चालकांना एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १० ते १५ वर्षांपासून वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व जिल्हा रुग्णालयात १०२ रुग्णवाहिका वाहन चालक कार्य करीत आहेत. हे वाहन चालक ८ ते ९ हजार मानधनावर २४ तास अहोरात्र काम करीत आहेत. तसेच अशोकाम प्रा. लि. कंपनी भोपाळचे कंत्राट ३० जुलै २०२१ ला संपुष्टात येत असून त्यांनी कंत्राट संपताच १०२ रुग्णवाहिका वाहन चालकांना एनआरएचएम अंतर्गत नियुक्ती द्यावी यासाठी त्यांनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले आहे. संपूर्ण राज्यामध्ये स्वत:ची काळजी न घेता परिवारापासून दूर राहून रुग्णाच्या मदतीसाठी धावून २४ तास रुग्णाकरिता १०२ रुग्णवाहिकेची सेवा देत असून त्यांच्यावर अन्याय केला जात आहेे. यासाठी एनआरएचमअंतर्गत नियुक्ती न मिळल्यास तीव्र आंदाेलनाचा इशारा दिला रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.
कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचा आंदोलनाचा इशारा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:27 AM