गोंदिया : कोरोनामुळे अनेक लोकांनी घरात नविन पाहुणा येऊ नये म्हणून कोरोनाच्या काळात खूप काळजी घेतले. कोरोनाच्या काळातही लग्नसमारंभ मोठ्या गाजावाजा करीत पार पाडला. मागील सव्वावर्षात लग्नसमारंभ झाले परंतु लग्न झालेल्या जोडप्यांनी कोरोनाच्या काळात आपली अडचण होऊ नये म्हणून संतती होऊ नये म्हणून काळजी घेतली.
काहींनी लग्न थांबविले आहे, तर काहींनी कोरोनाचा प्रसार म्हणून लग्न पुढे ढकलले आहे. एकंदरीत कोरोनामुळे पाळणा लांबला आहे. आरटीपीसीआर टेस्ट आणि कमी उपस्थिती या कारणांमुळे लग्नाच्या प्रमाणात घट नोंदविली गेली आहे. २०१९ मध्ये ३१२ विवाहाची नोंदणी झाली होती. आता ही नोंदणी २२ च्या घरात आहे. याचा परिणाम जन्मदरावरही झाला आहे.त्याचप्रमाणे कोरोना काळात मृत्यूची संख्या वाढल्याने मृत्यूदरात मोठ्या संख्येने वाढ नोंदविली जात आहे. काही गावांचा अहवाल सादर झाल्यावर २०२१ ची नोंद पुढे येणार आहे
......................
जन्मदरातही घसरण
जिल्ह्यामध्ये लग्नाची संख्या घटली आहे. नोंदणीकृत विभाग पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. परिणामी जन्मदरातही घट नोंदविण्यात आली आहे. कोरोनाची धास्ती घेऊन अनेकांनी गर्भधारणा होणार नाही यासाठी उपाय योजना केल्या होत्या. अनेकांनी तांबी बसविल्या होत्या.
.................
वर्ष------ जन्म------- मृत्यू----- विवाह नाेंदणी
२०१८-१९--१७३३२ ---९७१२ --------- ३१२
२०१९-२०--१७३०५-----८९२५ ---------३०१
२०२०- २१--१५९८२----१२०१० --------२२
२०२१-२२्---११८५----- ३६२०--------०१
..................
लग्नाची संख्याही घटली
कोरोनाच्या काळात लग्न समारंभ करणे म्हणजे स्वत:चे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. यासाठी अनेकांनी लग्न समारंभ करण्याचे टाळले. काहींनी लग्न जोडून ठेवले परंतु धुमधडाक्यात लग्न करण्याच्या नादात ते लग्न झालेच नाही. जी कमी वयाची मुले किंवा मुली होती त्यांनी एक दोन वर्ष पुढे लग्न ढकलले आहे. त्यामुळे लग्नांची संख्या घटली आहे.