गोंदिया : कोराेनाचा संसर्ग वाढतच असल्याने वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी पास करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ वी च्या १ लाख ५३ हजार ४४ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच पास करावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात वर्ग पहिलीत मुले ७४७७, तर मुली ७०८८ असे १४ हजार ५४५ विद्यार्थी, वर्ग दुसरा मुले ९६२४ तर मुली ८९१८ असे १८ हजार ५४२ विद्यार्थी, तिसऱ्या वर्गातील मुले १०४६३ तर मुली ९७१३ असे २० हजार १७६ विद्यार्थी, चवथी मुले १०५३७ तर मुली ९८६९ असे २० हजार ४०६ विद्यार्थी, पाचवी मुले १०१०१ तर मुली ९५५८ असे १९ हजार ६६४ विद्यार्थी, सहावी मुले १००३८ तर मुली ९४०२ असे १९ हजार ४४० विद्यार्थी, सातवी मुले १००६२ तर मुली ९५८८ असे १९ हजार ६५० विद्यार्थी, आठवी मुले १०४७५ तर मुली १०१२६ असे २० हजार ६०१ विद्यार्थी आहेत. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, याची चिंता पालकांना जास्तच सतावत आहे.
......
जिल्ह्यातील विद्यार्थी
वर्ग विद्यार्थी संख्या
पहिली---१४५६५
दुसरी--१८५४२
तिसरी---२०१७६
चौथी--- २०४०६
पाचवी--१९६६४
सहावी--१९४४०
सातवी--१९६५०
आठवी--२०६०१
...........
शिक्षणतज्ज्ञ म्हणतात...
कोट
सध्या कोरोना परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे.
- मिलिंद रंगारी, जिल्हा समुपदेशक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया.
.....
कोट
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना एकत्र बसवून परीक्षा घेता येणार नाही. त्यांना शाळेतही बोलावता येणार नाही. अशात घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.
-किशोर बावणकर, शिक्षक, जि.प. शाळा, आपकारीटोला.
....................
कोट पालक
कोरोनामुळे सरकारने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात पास करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे; परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही; परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.
- सुनील बोहरे, पालक, शिवणटोला
----
विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र, त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्यायच नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील; पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी पालकांचा आग्रह आहे.
- सचिन हुमे, पालक, आसोली.
........
शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही सरकारने आरटीई कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा पास केले जाणार आहे.
-अर्चना चिंचाळकर, पालक, विद्यानगरी, आमगाव.