जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणासाठी समोर येऊन कोरोना या जागतिक महामारीच्या आजाराचे उच्चाटन व्हावे यासाठी शासन, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग व इतर विभाग कार्य करीत आहेत. भोसा गावात लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी शाळेचे सहायक शिक्षक जैपाल ठाकूर यांनी आपल्या मोटार गाडीला ‘मी लस घेतली, तुम्हीपण घ्या, मास्क वापरा, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा’ याविषयी बॅनर लावून जनजागृती केली. यावेळी सरपंच सुनील ब्राह्मणकर, ग्रामसेवक एन.एच. चौधरी, पोलीसपाटील झनकराम ब्राह्मणकर, मुख्याध्यापक ए.एस. रावते, आर.एम. बोपचे, डी.टी. गिर्हेपुंजे, संजय धुर्वे, एन.एच. कटरे, आरोग्यसेवक भांडारकर, फरफुंडे, ऊके, जंगळे, अंगणवाडीसेविका सरिता वाढई, मंजू मटाले, आशासेविका हरिकांता कारंजेकर, ब्राह्मणकर, मदतनीस सीता बहेकार, वैशाली हुमे, ग्रामपंचायत परिचर मुलेश शेंडे सहकार्य केले.
भोसा येथे कोरोना लसीकरण जनजागृती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:29 AM