लसीकरणासंदर्भात ग्रामीण भागात असलेले चुकीचे संभ्रम दूर करून जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे यासाठी तालुका व गावस्तरीय यंत्रणा सज्ज आहे. लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू असा विश्वास सरपंच नरेश कावरे यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रसार बघता, लसीकरणाच्या बाबतीत काही चुकीचे गैरसमज निर्माण करण्यात आले आहे. त्याची समज घालून लसीकरण झाल्यास कोरोना संक्रमण टाळता येऊ शकते याची जाणीव करून देऊ असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनासंबंधित साहित्य कमी पडत असतील तर त्यांना तात्काळ साहित्य पुरविण्यात येईल अशी माहिती सालेकसाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित खोड़नकर यांनी दिली. १०० टक्के लसिकरणाचे उद्दिष्टपूर्ण करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पंचायत विस्तार अधिकारी निमजे, ग्रामसेवक ओ.के. राहंगडाले, सरपंच कावरे, उपसरपंच अफरोज पठान, ग्रा.प.सदस्य अजय उमाटे, वसंत साखरे, गौरव कोडपे, श्वेता अग्रवाल, सुषमा काळे, सुमन ठाकरे, सुनीता चकोले, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगनवाड़ी सेविका व सामाजिक कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत.
सातगांव उपकेंद्रात कोरोना लसीकरण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:30 AM