केंद्र सरकारने १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिक ज्यांना दुर्धर आजार आहेत अशांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. त्यांतर्गत आमदार रहांगडाले यांनी रविवारी लसीकरण करवून घेतले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, आरोग्य अधिकारी डॉ. कंचन रहांगडाले, सुषमा भिवगडे, सुनील पालांदूरकर, राजेश गुणेरिया आदी उपस्थित होते. सुनील पालांदूरकर व राजेश गुनेरिया यांनीही ऑनलाइन नोंदणी केल्यामुळे त्यांनाही कोरोना लस देण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांनी भीती न बाळगता कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदार रहांगडाले यांनी केले. कोविड-१९ चा प्रसार टाळण्यासाठी मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे व सॅनिटायझरचा वापर व वारंवार हात साबनाने धुण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तिरोडा तालुक्यातील २,५८६ लोकांना कोरोना लस देण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:32 AM