लसीकरणाच्या सेशनची पहिली लस आयुष विभागाचे केटीएसचे समन्वयक डॉ. महेंद्र संग्रामे यांनी सर्वप्रथम घेतली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम व डॉ. संजय माहुले यांच्या हस्ते आयुष विभागातील डॉ. ममता पिठेकर, डॉ. नीलिमा कुथे, डाॅ. चव्हाण व रक्तपेढी अधिकारी प्रा. संजय चव्हाण यांनी स्वत: सर्वप्रथम लसीकरण करून आपला अधिनस्त पॅरामेडिकल स्टाफला प्रोत्साहित केले. कोविन ॲप साॅफ्टवेअरचा पार्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सांख्यिकी अधिकारी तलमले, पवन कहाले, मनीष मदने यांनी प्रत्येक लाभार्थ्याचे अधिकृत ऑथिनेशन......... केले. ओळखपत्राची पडताळणी केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या नेतृत्वात मेट्रन अनू नांदणे, अवस्थी, विनय, नेहा टेंभुर्णीकर, रूपाली गेडाम, मनीषा बोहणे, दुर्गा ठाकरे या स्टाफ नर्सेसच्या टीमने कोरोना योद्ध्यांना कोविशिल्ड लसीचे लसीकरण केले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील ब्राम्हणकर, रहांगडाले, सचिन लोखंडे, पीएचएन निलू चुटे व मेट्रन ऑफीसमधील सर्व स्टाफ नर्सेस यांनी स्वत: कोविशिल्ड लसीकरण करून घेऊन आदर्श निर्माण केला. केटीएस गोंदिया या बूथवर गोंदिया तालुक्यातील सर्व पीएचसीचे डॉक्टर्स, नर्सेस, एमपीडब्ल्यूएस, आशा या हेल्थ वर्करचे लसीकरण होणार आहे.
.....
गोंदियातील कर्मचाऱ्यांना लवकरच लसीकरण
बीजीडब्ल्यूएच व केटीएस आणि जीएमसी या शासकीय आरोग्य संस्थेतील स्टाफ व गोंदिया शहरातील डॉक्टर त्यांचे खासगी दवाखान्यातील त्यांचा स्टाफ यांचे क्रमाक्रमाने लसीकरण होणार आहे. मंगळवारी १०० कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचे टार्गेट आहे. लसीकरणाबाबत सर्व स्टाफमध्ये चांगलीच उत्सुकता आहे.