साखरीटोला : सतत वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव यावर उपाय म्हणून सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील व्यापारी संघटना व गावकऱ्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात एक सभा घेऊन जनता कर्फ्यू अंतर्गत गावात कडक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत शनिवार, रविवार व बुधवार आठवड्यात हे तीन दिवस साखरीटोला येथील व्यवसायिक प्रतिष्ठान पूर्णपणे बंद राहणार आहेत. जनतेने स्वयंस्फूर्तपणे आरोग्य विभागाला सहकार्य करावे, आरोग्य विभाग सदैव जनतेच्या सेवेसाठी सज्ज व तत्पर आहे. आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर यांनी सांगितले.
साखरीटोला-सातगांव व परिसरातील गावात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. स्थिती गंभीर आहे, कोरोनामुळे गाव आता हॉटस्पॉट झाले आहे, अशात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू हाच एकमेव उपाय आहे. सभेत सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित खोडनकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सरपंच नरेश कावरे, सदस्य श्वेता अग्रवाल, सुनीता चकोले, प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, गोपचंद पंजवानी, भागेश छाबडा, अशोक गिरी, अशोक मेहर, नंदकिशोर लांजेवार, व्यापारी संघटनेचे देवराम चुटे, राजेश डोंगरे, आशिष अग्रवाल, पृथ्वीराज शिवणकर, काश्मिरसिंह बैस, आकाश बावनकर, राहुल मेहर, संजय मिश्रा, शैलेश बहेकार, जितू बहेकार, मोहनलाल दोनोडे, किसन चकोले, प्रोग्रेसिव्ह संघटनेचे रजत दोनोडे, मनोज गजभिये, मिश्रा रंजित लांजेवार, तुषार शेंडे, मिलिंद कोडापे, राहुल चकोले उपस्थित होते.