शुक्रवारी (दि.२५) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ३६०३ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ९११ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २६९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात ५ नमुने पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१२ टक्के आहे तर तीन बाधितांनी कोरोनावर मात केली. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १९१०५१ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६५६८८ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत २१२०७३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १९११२८ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४११०६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०३५८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ४९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३१० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोना रिकव्हरी रेट ९८.१९ टक्के आहे. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
.............
३ लाख ८९ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील १४० लसीकरण केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेतंर्गत ३ लाख ८९ हजार ७२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आता लसींचा भरपूर साठा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे.