शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

अवघा ३५.३१ टक्के निधी खर्च

By admin | Published: February 12, 2017 12:31 AM

जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक शनिवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले

शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञान विभाग माघारले : पालकमंत्र्यांनी डिपीडीसीत व्यक्त केली नाराजी गोंदिया : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक शनिवारी (दि.११) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या सन २०१६-१७ या चालू आर्थिक वर्षासाठी नियोजित निधीचा आढावा घेतला. मात्र निधी खर्च करण्यात अनेक विभाग पिछाडीवर असल्याचे दिसून आले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघा दिड महिना शिल्लक असताना एकूण मंजूर नियतव्ययाच्या केवळ ३५.३१ टक्के निधी खर्च झाल्याचे पाहून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या ३१ मार्चपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी तातडीने कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ.संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकूंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हा आणि विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी आढाव्याची माहिती दिली. जिल्ह्यात सर्वसाधारण योजनेसाठी ११८ कोटी ३८ लाख मंजूर नियतव्यय होता. तेवढीच अर्थसंकल्पीय तरतूद करून निधीही प्राप्त झाला होता. मात्र त्यापैकी केवळ २६ कोटी ५५ लाख ८७ हजार रुपये म्हणजे केवळ २२.४२ टक्के निधी खर्च झाला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपयोजना आणि ओटीएसपी योजनेअंतर्गत प्राप्त निधीही बऱ्याच प्रमाणात खर्च झालेला नाही. सर्व योजना मिळून केवळ ८२ कोटी ५ लाख २१ हजार रुपये खर्च झाले आहेत. या बैठकीत नवीन आर्थिक वर्षासाठी अनेक कामांवर भरीव तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठात्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम या पत्रपरिषदेत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील अव्यवस्था व ढिसाळ कारभाराचा विषय पत्रकारांनी छेडला. त्यावर पालकमंत्र्यांनी अधिष्ठाता डॉ.अजय केवलिया यांना चांगलेच धारेवर धरले. मेडिकल कॉलेजच्या विदर्भवीर प्राध्यापकांसह संपूर्ण कारभार येत्या १५ दिवसात रूळावर आणण्याचा निर्वाणीचा इशारा पालकमंत्र्यांनी त्यांना दिला. तसेच केटीएस रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन सुरू करण्यासाठी काय पाहीजे ते सांगा पण ही सेवा तातडीने सुरू करा, असे ते म्हणाले