मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार ते दर महिन्याला देणार आहेत. मानस उपचार तज्ञांची चमू दर महिन्याला सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील या एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध आहे. तालुक्यातील नवेगावबांध व अर्जुनी मोरगाव ग्रामीण रूग्णालयातही या सुविधेचा लाभ रुग्णांना घेता येईल. मानसिक आजारग्रस्त रुग्णांनी चिकित्सा व उपचार याचा लाभ घ्यावा. मानसिक विकार असलेल्या परिसरातील रुग्णांना गोंदिया येथे जावे लागणार नाही. कोरोना लसीकरणासाठी ६९ व ४५ ते ५९ वर्षे वय असलेल्या लोकांनी आपले नाव ग्रामपंचायत येथे नोंदवावे. कोरोना चाचणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन वेळोवेळी आपले नाव नोंदवावे असे डॉक्टर कुलकर्णी यांनी सांगितले. गावोगावी जाऊन कोरोनाची चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जात असल्याची माहिती डॉ. श्वेता कुलकर्णी डोंगरवार यांनी दिली आहे.
मानसिक आजारग्रस्त रुग्णांना सल्ला व औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:26 AM