कोरोना संसर्गाची तीव्रता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपाययोजना व खबरदारी घेतली जात असली तरीही बाधितांच्या वाढत्या संसर्गावर अंकुश लागताना दिसत नाही. तसेच ग्रामीण भागातही संसर्गाचा शिरकाव झाला आहे. गावागावात बाधित आढळत आहेत. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. ज्या कुटुंबात बाधित आढळला की, भीती निर्माण होते. यामुळे बाधित व कुटुंब नैराश्येत जाऊ नये, याकरिता समुपदेशन करण्याच्या सूचना आहेत. यानुसार सेजगाव येथे कोरोना व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना बाधित रुग्णाच्या घरी भेट देऊन समुपदेशन केले. वॅक्सिन संदर्भात जनजागृती केली. यावेळी कोरोना व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच कंठिलाल पारधी, ग्रामसेवक डी. बी. मालाधारी, तलाठी पवन चाफले, शिक्षक उईके, बिसेन, आरोग्यसेविका पारधी, आशासेविका सुरेखा पारधी, संगीता बडगे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
सेजगाव येथे कोरोना बाधितांचे समुपदेशन व जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:30 AM