नितीन आगाशे।आॅनलाईन लोकमततिरोडा : आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे. विशेष म्हणजे, आणखीही ३८ प्रकरणांत समुपदेश केंद्राचे कार्य सुरू आहे.संसार म्हटला की भांड्याला भांडे लागणारच. काही ना काही कारणांतून पती-पत्नी मध्ये खटके उडून त्याचे पर्यावसन कोर्टकचेरीपासून घटस्फोटापर्यंत जावून दोघांचा संसार उद्ध्वस्त होतो. मात्र याचा परिणाम मुले व दोन्ही कुटुंबांना भोगावा लागतो. ही बाब लक्षात घेत राज्य शासनाने आयुक्तालय पुणे अंतर्गत महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. हे समुपदेशन केंद्र दाम्पत्य जीवनातील विभक्त होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या पती-पत्नीच्या निर्णयांत परिवर्तन घडवून आणण्याचे काम करते.दोघांची समजूत घालून टोकावर गेलेल्या घटस्फोटाच्या निर्णयापासून दोघांना मागे आणून नव्याने संसार थाटण्याची ज्योत प्रज्वलीत करते.विशेष म्हणजे, समुपदेशनाचा हा प्रयोग यशस्वी ठरु लागल्याचा प्रत्यय तिरोडा तालुक्यात आला आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये सुरु झालेल्या येथील महिला समूपदेशन केंद्राने डिसेंबर १७ पर्यंत दाखल ६०६ प्रकरणांपैकी ५६८ प्रकरणांत परस्पर समुपदेशनातून घटस्फोटाचा निर्णय बाद करून पती-पत्नीला पुन्हा जवळ आणण्यात यश प्राप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण चार महिला समुपदेशन केंद्र असून यात गोंदिया, तिरोडा, देवरी व अर्जुनी-मोरगाव पोलीस उपविभागांचा समावेश आहे. येथील समुपदेशन केंद्रांतर्गत दवनीवाडा, गंगाझरी व तिरोडा पोलीस स्टेशनचे क्षेत्र येते.मागील पाच वर्षात येथील समुपदेशन केंद्रात एकूण ६०६ प्रकरणांत कलह विकोपाला गेल्याची प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यापैकी ५६८ प्रकरणांत समुपदेशनातून त्यांचे संसार वाचविण्यात आले. अजून ३८ प्रकरणांत सामंजस्यातून विवाद सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुदेशक दिनेश कावडकर व सोनम पारधी यांचे अथक प्रयत्न मोडकळीस आलेले दाम्पत्य जीवन पुन्हा फुलविण्यात यशस्वी ठरत आहेत.
समुपदेशन केंद्राने वाचविले ५६८ संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 9:44 PM
आपसी वादातून घटस्फोटाच्या निर्णयांपर्यंत मजल गाठलेल्या ५६८ प्रकरणांत समुपदेशन केंद्राने मध्यस्ती केली. सनुपदेशनातून पती-पत्नीतील वादाचा अंत करून ५६८ संसार वाचविण्यात या समुपदेशन केंद्राला यश आले आहे.
ठळक मुद्देघटस्फोट टळला : ३८ प्रकरणात सुरू आहेत प्रयत्न