अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ. के. जी. तुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडनकर, संघटनेचे सचिव डॉ. संतोष येवले, कोषाध्यक्ष डॉ. राजेश तिवारी, महासचिव डॉ. के. बी. राणे, संघटक डॉ. आर. टी. चौधरी, तिरोडा तालुकाध्यक्ष डॉ. सी. एच. भगत, कार्याध्यक्ष डॉ. बी. ए. बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
इलेक्ट्रो होमिओपॅथीवर विश्वास ठेवून आपल्या पॅथीमध्ये उपचार करा, चांगले संशोधन करा, भविष्यात आपली पॅथी एक दिवस नक्की राजपत्रीत होईल, असे मत डॉ. खोडनकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर डॉ. तुरकर यांनी इलेक्ट्रो होमिओपॅथीच्या आजच्या घडामोडींवर मार्गदर्शन केले व संघटनेच्या कार्यावर भर दिला. प्रास्ताविक डॉ. येवले यांनी केले. संचालन डॉ. योगेश हरिणखेडे यांनी केले. आभार डॉ. भगत यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. सुर्यवंशी, डॉ. गणेश बिसेन, डॉ. डोये, डॉ. दीपक बाहेकार, डॉ. यादेश्वर अंबुले, डॉ. प्रशांत बोंबार्डे, डॉ. यु. बी. शरणागत, डॉ. टेंभरे, कृष्णा पटले, येले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.