शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

भारतीय राज्यघटनेमुळे देश एकसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:54 AM

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या सर्व जातीधर्मांचे कल्याण केले. बाबासाहेबांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले,....

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सडक-अर्जुनी येथे ‘एक शाम शहिदों के नाम’

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अंमलात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहून भारताच्या सर्व जातीधर्मांचे कल्याण केले. बाबासाहेबांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे संविधान लिहून भारत एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.तेजस्विनी लॉनमध्ये सत्यभामा बहुउद्देशिय प्रशिक्षण संस्था सडक अर्जुनी आणि मित्रपरिवारातर्फे शुक्रवारी ‘एक शाम शहिदों के नाम’ कार्यक्रम घेण्यात आले. यात उद्घाटनप्रसंगी ना. राजकुमार बडोले बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रकाश चंद्रिकापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. उपसभापती राजेश कठाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, नगरसेवक देवचंद तरोणे, नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, सौंदडच्या सरपंच गायत्री इरले, आयोजन समितीचे अध्यक्ष एफ.आर.टी. शहा, गौरव पुस्तिकेचे संपादक कविता रंगारी, प्रा. राजकुमार भगत, स्वागताध्यक्ष किशोर डोंगरवार, तेजराम मडावी उपस्थित होते.या वेळी बडोले यांनी भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. देशभक्ती गीत स्पर्धा व समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. एफ.आर.टी. शहा, प्रा. राजकुमार भगत, तेजराम मडावी यांनी मार्गदर्शन केले.यानंतर लगेच बक्षीस वितरण सोहळा मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. अतिथी म्हणून डुग्गीपारचे ठाणेदार किशोर पर्वते, किशोर डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, प्रा. राजकुमार भगत, तेजराम मडावी उपस्थित होते.समूह देशभक्ती नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार मिळविणाºया पार्थ ज्युनिअर कॉलेजच्या चमूला ७ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र; द्वितीय पुरस्कार लोकमान्य शाळा कोकणा ५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र; तृतीय पुरस्कार मिळविणाऱ्या साकोलीच्या जितेंद्र मेश्राम गृपला ३ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. एकल देशभक्ती गीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या गोरेगावच्या समृद्धी बहेकार हिला ५ हजार रुपये, द्वितीय गायत्री राठोड ३ हजार रूपये व तृतीय आलेल्या कोकणा येथील पवनकुमार शेंडे याला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.संचालन अशोक लांजेवार यांनी केले. आभार सत्यभामा बहुउद्देशिय संस्थेचे सचिव महेंद्र चंद्रिकापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला महेश सूर्यवंशी, रंजिता मेश्राम, प्रा. अश्विन लांजेवार, बी.एम. रामटेके, मार्कंड चौरे, अतुल फुले, मनोज खंडेलकर, सुधाकर कुर्वे, रजनीश पंचभाई, उमेश कोटांगले, रजनीश मेश्राम, छगन कावळे, जियालाल रंगारी, नरेश डोंगरे, निकेश उके, डॉ. परमानंद कठाणे, सैयद शादीक अली, संध्या चंद्रिकापुरे यांनी सहकार्य केले.गौरव पुस्तिकेचे प्रकाशनप्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सडक अर्जुनी तालुक्यातील संपूर्ण माहिती असणारी गौरव पुस्तिका काढून तिचे ना. राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तालुक्यातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव ग्रंथामध्ये समावेश करण्यात आला. तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यामध्ये डॉ. प्रभाकर गहाणे, मेहजबिन राजानी, प्रभू डोंगरवार, बापूसाहेब इरले, आर.व्ही. मेश्राम, सृष्टी फाऊंडेशन, मधुसूदन दोनोडे, अनिल मेश्राम यांचा समावेश आहे.