लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शेजारी राहणाऱ्या महिलेला घरात शिरून शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपीला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची ठोठावला आहे. तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील १६ एप्रिल २०१७ मधील हे प्रकरण आहे.अर्जुनी-मोरगाव येथील न्यायालयात स्टेनो पदावर कार्यरत आरोपी प्रमोद भोजराज बिसेन (रा.मोहाडी) याने १६ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता शेजारी राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन शरीर सुखाची मागणी केली होती. तसेच याबाबत कुणाला सांगीतल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर आरोपीने घराच्या भिंतीवर चढून तिला अश्लिल इशारे केले होते.यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास चंद्रमणी खोब्रागडे यांनी केला होता. गोंदियाचे मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल साठे यांच्या न्यायालयात प्रकरण सुरू असतांना त्यांनी या प्रकरणावर गुरूवारी (दि.२) सुनावणी केली.या प्रकरणात आरोपीला भादंविच्या कलम ३५४ (अ) अन्वये एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड. तर कलम ४४७ अन्वये दोन महिन्यांची शिक्षा व ५०० रुपये दंड. तसेच कलम ५०९ अन्वये एक वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व कलम ५०७ अन्वये आरोपीला शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून बोधीनी शशीकला यांनी युक्तिवाद केला.
कोर्टाच्या स्टेनोला एक वर्षाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 9:26 PM
शेजारी राहणाऱ्या महिलेला घरात शिरून शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपीला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची ठोठावला आहे. तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील १६ एप्रिल २०१७ मधील हे प्रकरण आहे.
ठळक मुद्देविनयभंगाचे प्रकरण : मोहाडी येथील घटना