दिल्ली सीमेवर मागील १० महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला भाकप राज्य शेतकरी सभा, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व आयटकने समर्थन दिले आहे. तिन्ही काळे कृषी कायदे त्वरित रद्द करा, किमान समर्थन दर (एमएसपी) कायद्याची हमी द्या, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ थांबवून त्यांचे दर कमी करा, कामगारविरोधी कोड बिल रद्द करा, भूमिहीनांना वन हक्क जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. भारत बंद यशस्वी करावा, असे भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, तालुका सचिव चरणदास भावे, कल्पना डोंगरे, परेश दुरूगवार, दुलीचंद कावडे, नारायण भलावी, भोलाराम मरसकोल्हे, चैयतराम दियेवार, गंगाराम भावे यांनी कळविले आहे.
भाकपचे आज भारत बंदचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:30 AM