गोंदिया : भारतीय कॉम्युनिस्ट पार्टीच्या वतीने शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य कार्यकारिणीचे हौसलाल रहांगडाले व करुणा गणवीर यांच्या नेतृत्वात मोर्चा नेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाच्या माध्यमाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यात प्रमुख मागण्यांमध्ये मागील पावसाळी व उन्हाळी पिकांचे पाऊस गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान देण्यात यावी, दुबार पेरणीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय देण्यात यावे, त्यासाठी सर्वेक्षणाची अट घालू नये, खताचा मुबलक पुरवठा करावा, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवआई करावी, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, रोजगार हमी कायद्याचे अजुनही न झालेले चुकारे तत्काळ देण्यात यावे, धानाला प्रतिक्विंटल प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये भाव देण्यात यावा, वनजमिनीचे पट्टे देण्याची कार्यवाही मंडळ अधिकारी स्तरावर शिबिर घेवून करण्यात यावी, ५८ वर्षावरील सर्वांना ३ हजार रुपये मासिक पेंशन देण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश होता. या मोर्चा व धरणे आंदोलनात प्रामुख्याने जिल्हा सचिव मिलिंद गणवीर, जिल्हा सहसचिव रामचंद्र पाटील, जिल्हा सहसचिव शेखर कनोजिया, गोंदिया तालुका सचिव वासुदेवराव ढोके, भैयालाल शहारे, तालुका सहसचिव गोरेगाव चरणदास भावे, जशोदा राऊत, चंदा इंगळे, प्रियंका ढोेके, महिला फेडरेशन चंपाताई चौरे, युथ फेडरेशन परेश दुरुगवार, अर्पित बंसोड, राजेश वैद्य, भोजलाल हरिणखेडे व अशोक मेश्राम यांचा समावेश होता. (जिल्हा प्रतिनिधी)
भाकपचा मोर्चा
By admin | Published: August 19, 2014 11:47 PM