पोलीस संरक्षणात आरोपी पसार : न्यायासाठी टेकचंदच्या विधवेची पायपीट लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : आमगाव पोलीस ठाणे येथील विविध प्रकरणांतील तपास कार्यातील तफावत व आरोपींना शह देण्याच्या कार्यपद्धतीमुळे न्याय मागण्याची विभागाकडून निराशा होत आहे. यातच अपघात प्रकरणातील आरोपींना शह मिळत असल्याने तपास कार्यावर दडपणाचे पांघरुन घालण्यात येत आहे. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्या टेकचंदच्या विधवेला न्याय मिळवून घेण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टेकचंद बळीराम शेंडे (३५) ३० एप्रिल रोजी गोंदियाकडे वाहन क्रमांक एमएच ३५/क्यु-४३४६ ने जात असताना मागून येत असलेल्या टाटा इंडिका गाडी क्रमांक एमएच ३५/पी-७२१५ ने त्यांना दहेगाव येथे जबर धडक दिली. यात टेकचंद शेंडे गंभीर जखमी झाला व टाटा इंडिका वाहन चालकाने शासकीय रुग्णवाहिका बोलावून घेतली. परंतु रुग्णवाहीकेला उशीर होत असल्याने इंडिका वाहन चालकाने जखमी टेकचंदला आपल्या गाडीत टाकले व घेऊन गेला. मात्र अदासी-तांडा पर्यंत आल्यावर वाटेत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने त्याने जखमी टेकचंदला रुग्णवाहिकेत टाकले व पसार झाला. रूग्णवाहिकेने जखमी टेकचंद शेंडे यांना प्रथम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु त्यांच्या डोक्यावर जबर मार असल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पीटल येथे त्याच दिवशी दाखल करण्यात आले. या रुग्णालयात सलग १६ दिवस उपचारानंतर तो घरी परतला. परंतु १९ मे रोजी प्रकृती खालावल्याने टेकचंद यांचा मृत्यू झाला. या अपघाताची पूर्ण माहिती दिल्यावरही पोलीस विभागाने वेळीच दखल घेतली नाही. घटनेसंदर्भात पोलीस पाटील संजू फुंडे यांनी पोलीस ठाण्यात सूचना केली. त्यावर मृतकाची चौकशी करण्यात आली. १९ मे रोजी मृतकाचे शवविच्छेदन करुन पार्थीव कुटूंबीयांना सोपविण्यात आले. परंतु अपघातातील आरोपीचा थांगपत्ता लागला नाही. तर पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुध्द भादंविच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपीला शह दिला. त्यामुळे मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरही साधी दखल घेण्यात आली नाही. घटनास्थळाचा पंचनामा नाही ३० एप्रिल रोजी दहेगाव येथे राज्यमार्गावर मृत टेकचंद यांच्या वाहनाला टाटा इंडिका वाहन क्रं. एमएच३५/पी-७२१५ ने जबर धडक दिली. या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला नाही. तर टेकचंदचा मृत्यू १९ मे रोजी झाला यावेळी पोलीस विभागाने मृतकाच्या घराचा पंचनामा २० मे रोजी करुन तपासात तफावत निर्माण केली. विशेष म्हणजे, घटनेचा तपास सखोल व्हावा व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मृताची पत्नी हेमलता शेंडे यांनी पोलीस अधीक्षकांना १९ जून रोजी लेखी तक्रार केली. यावर पोलीस अधिक्षकांनी सदर घटनेची दखल घेण्याचे लेखी निर्देश दिले होते. परंतु त्यांच्या निर्देशाचीही दखल घेण्यात आली नाही. न्यायाची मागणी माझ्या पतीचा अपघात झाल्यानेच मृत्यू झाला. अपघात घडविणाऱ्या वाहनाची माहिती पोलीस विभागाला आहे. परंतु कारवाई शून्य आहे. पोलीस प्रशासनाने मला न्याय द्यावा. अशी हाक मृताची पत्नी हेमलता शेंडे यांनी पोलीस प्रशासनाकडे लावली आहे. तसेच प्रकरणाला दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस शिपाई लांजेवार यांच्यावर कारवाईची
अपघाताचा तपास दडपणात
By admin | Published: July 12, 2017 2:23 AM