लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून बनावट कागदपत्रे तयार करुन पीक कर्जाची उचल करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करुन बुधवारी (दि.२४) अटक करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार हेमराज पाडुरंग कुलसुंगे (३५) मु.देवरी, आनंद नत्थु रामटेके (५०) मु. देवरी, राजू बेनीराम शहारे (३३) मु. वराडघाट, शामराव बिसन मानकर (५२) मु. वडेगाव यांनी आपले मूळ नाव बदलवून तसेच शेत जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करुन अर्जुनी-मोरगाव येथील बँक आॅफ इंडिया शाखेतून २८ फेब्रुवारी २०११ ते १८ मार्च २०११ या कालावधीत २ लाख ४८ हजार रुपये पीक कर्जाची उचलून करुन बँकेची फसवणूक केली होती.पीक कर्जाची उचल करताना त्या चौघांनी वडेगाव रेल्वे, इटखेडा-इसापूर, हेट्टी-खामखुरा, वडेगाव-रेल्वे याप्रमाणे राहण्याचा पत्ता दिला होता. कर्जासाठी शेतीचा सातबारा, हैशीयत प्रमाणपत्र, शेतजमिनीचा नकाशा इत्यादी दस्ताऐवज जोडलेल्यांची खातरजमा महसूल विभागाकडून केली असता, ते सर्व दस्ताऐवज बनावट असल्याचे बँकेच्या निदर्शनास आले. तसेच कर्जाची उचल करताना दिलेला पत्ता याची चाचपणी केली असता त्या ठिकाणाचे ते रहिवासी नसल्याचे आढळले.बनावट दस्तावेज तयार करुन २ लाख ४८ हजार रुपयांची उचल केलेले व त्याची व्याजासह परतफेड न केल्यामुळे ३ लाख २८ हजार १६३ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बॅकेनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशनला नोंदविली. दरम्यान प्रकरणाचे गांर्भिय ओळखून पोलीसांनी तपासाचा वेग वाढविला.या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. देवरी येथील हेमराज पाडुरंग कुळसुंगे याला ५ मे २०१८ रोजी शिताफीने पकडून सर्वप्रथम गजाआड करण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरुन बँक फसवणूक प्रकरणाचा मास्टरमार्इंड असलेले टिकाराम बाबुलाल लिल्हारे (५९), रविंद्र टिकाराम लिल्हारे (३२) या पितापुत्रांना ७ मे २०१८ रोजी पकडण्यात पोलिसांना यश आले.याच प्रकरणातील ४ था आरोपी आनंद नत्थू रामटेके (५०) मु. देवरी याला २४ आॅक्टोबरला पोलिसांनी पकडून गजाआड केले.प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अन्य एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. बँकेच्या पीक कर्ज अफरातफर प्रकरणी पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगाव येथे आरोपींविरुध्द भांदवीच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक माणिक खरकाटे तपास करीत आहे.
बनावट कागदपत्रे तयार करुन पीक कर्जाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:55 PM
अर्जुनी मोरगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून बनावट कागदपत्रे तयार करुन पीक कर्जाची उचल करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करुन बुधवारी (दि.२४) अटक करण्यात आली.
ठळक मुद्देचार जणांना अटक : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना