लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : थोरूपुरूष व विचारवंतानी नेहमीच शिक्षणावर भर दिला आहे. जो समाज शिक्षित झाला त्या समाजाने निश्चित प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे समाजात जागृती निर्माण होवून एकोपा आणि बंधूभाव निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळेच शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित कुडवा येथील स्टॉर इंटरनॅशनल स्कुलच्या वार्षिक स्रेहसंमेलनानिमित्त शनिवारी (दि.२) आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आ.राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, सुनिता जैन, रिचा जैन, प्राचार्य नरगीस काजी, जगदीश अग्रवाल, प्रा.रजनी चतुर्वेदी, प्राचार्य मृत्यूजंय सिंग,आलोक व्दिवेदी, प्रा.बी.आर.शर्मा, प्रा.हरिश त्रिवेदी, राजू एन जैन, हितेश जोशी, एजाज शेख, श्रध्दा महाजन, माधुरी नासरे, सुवर्णा हुबेकर, मधुमिता सिंग, गिरीश कुदडे, केतन तुरकर, संकल्प जैन, प्रयास दवे, समीर तिवारी, आशिष हुकवानी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व स्व.मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.वर्षा पटेल म्हणाल्या, गोंदिया शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून देश आणि विदेशात आपले नाव मोठे केले आहे. या शिक्षण संस्थेत कार्यरत प्रत्येक कर्मचारी आणि विद्यार्थी हा आपला परिवार आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी संस्थेचे आणि खा.प्रफुल्ल पटेल यांचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासाची जी जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली ती आपण तेवढ्याच जबाबदारीने वाहून दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास करण्यास आपण कठिब्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. स्टॉर इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेवून शाळेचे आणि आई-वडिलांचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले. राजेंद्र जैन म्हणाले, खा.प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांच्या नेतृत्त्व व मार्गदर्शनाखाली गोंदिया शिक्षण संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. स्टॉर इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेवून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मोठे करावे हे प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांचे स्वप्न असल्याचे जैन म्हणाले.निखिल जैन म्हणाले, शहरात अनेक नामांकित शाळा सुरू असताना आपण प्रफुल्ल पटेल आणि वर्षा पटेल यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली स्टॉर इंटरनॅशनल शाळेची स्थापना केली. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यामुळेच अल्पावधीत या शाळेने एक वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले. या वेळी गणेश वंदना, कवि संमेलन, रास लिला, नृत्य, लावणी व विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांनी उपस्थितीतांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:09 PM
थोरूपुरूष व विचारवंतानी नेहमीच शिक्षणावर भर दिला आहे. जो समाज शिक्षित झाला त्या समाजाने निश्चित प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे समाजात जागृती निर्माण होवून एकोपा आणि बंधूभाव निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळेच शिक्षणामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.
ठळक मुद्देवर्षा पटेल : स्टार इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्रेहसंमेलन