शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोषणकर्त्याला सोडले वाऱ्यावर

By admin | Published: October 04, 2015 2:37 AM

धार्मिक स्थळांवर कोट्यवधीची उधळण, मात्र देशाचा पोषणकर्ताच आत्महत्येच्या मार्गावर असताना त्याकडे शासन लक्ष देत नाही.

विद्यार्थ्यांची खंत : शेतकरी आत्महत्येवर रंगली वादविवाद स्पर्धागोंदिया : धार्मिक स्थळांवर कोट्यवधीची उधळण, मात्र देशाचा पोषणकर्ताच आत्महत्येच्या मार्गावर असताना त्याकडे शासन लक्ष देत नाही. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस मंजूर केला पण अजूनपर्यंत बोनस मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येऊन आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. नमाद महाविद्यालयात शेतकरी आत्महत्या थांबविण्यास शासन अपयशी ठरतेय का? या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हा सूर व्यक्त केला.लोकमत युवा नेक्स्ट, विदर्भ स्टडी सर्कल गोंदिया, राष्ट्रीय सेवा योजना व नमाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. देवी सरस्वती व लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.उद्घाटन विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. रजनी चतुर्वेदी, अतिथी म्हणून जिल्हा विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख व प्रा. बबन मेश्राम उपस्थित होते. शेतकऱ्यांना पिकासाठी सिंचनाची सोय झाली तर शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबेल, असे उद्गार यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांनी काढले. अध्यक्षीय भाषणात डॉ.रजनी चतुर्वेदी यांनी गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील ८५ टक्के शेतकरी वर्षातून एकदाच पीक घेतात. त्यामुळे जनावरांना वैरणाची समस्याही निर्माण होते असे सांगितले.या स्पर्धेत जिल्हाभरातून नमाद महाविद्यालय, डीबी सायन्स, एस.एस. गर्ल्स महाविद्यालय व इतर ठिकाणातून ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत नमाद महाविद्यालय गोंदियाच्या विद्यार्थिनी शितला मानदाडे प्रथम, आशिष नूतन द्वितीय तर धोटे बंधू विज्ञान महाविद्यालच्या कल्याणी डहारे हिला तृतीय क्रमांक देण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस खेमेंद्र बिसेन याला देण्यात आला. परीक्षक म्हणून सविता बेदरकर, प्रा. दिप्ती मिश्रा, वैशाली खोब्रागडे यांनी जबाबदारी सांभाळली.स्पर्धेचे संचालन राखी पटले तर आभार प्रा. बबन मेश्राम यांनी मानले. यावेळी परिक्षकांचा व अतिथींची स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांच्या मार्गदर्शनात दिप्ती भोंगाडे, प्रवीण सुलाखे, गौरव बिसेन, कल्याणी डहारे, हर्षल शेंडे, योगेश दराडे, रोहित रहांगडाले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)