शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

'क्राइम' रेट वाढला ! सहा महिन्यांत १७ खून; ४२ आरोपींच्या हाती बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 4:01 PM

क्षुल्लक कारणातून घडताहेत मोठे गुन्हे: रेती व भूमाफियांमुळे गुन्हेगारीत वाढ

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील अल्पवयीन मुले व तरुणांमध्ये संघटित गुन्हेगारी वाढत आहे. क्षुल्लक कारणातून गंभीर गुन्हे घडत असून, वाढणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करीत आहे. परंतु, शालेय वयात असलेल्या मुलांकडे त्यांच्या पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या बालकांना संघटित गुन्हेगारीकडे ओढून घेत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांपैकी फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने वगळता सर्वच महिन्यांत खुनाच्या घटना घडल्या आहेत. यंदा १७ खुनाच्या घटना घडल्या असून, यात ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

गोंदियात संघटित गुन्हेगारी डोकावून पाहत आहे. क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली तरी त्या बाचाबाचीतून खून करण्यापर्यंतची मजल शहरातील तरुण मारत आहेत. कायदा कितीही कडक असला आणि कायद्याचे पालन करणारे पोलिस अधिकारी कितीही कर्तव्यदक्ष असले तरी अल्पवयातच मुलांवर योग्य संस्कार होत नसल्यामुळे ती बालके शाळेत जाताच मित्रांच्या नादात गुन्हेगारी जगतात प्रवेश करतात. क्षुल्लक कारणातून खून करण्यापर्यंतची खुन्नस ठेवणे, त्यासाठी संघटित गुन्हेगारी करणे असा फेंड शहरात वाढत आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास आपल्या घरातील तरुण मुलगा आपल्या घरी नाही, तो कुणाचा तरी खून करायला निघाला आणि त्याला आवर न घालता मोकाट सोडणारे पालक त्याच्या भविष्याची चिंता न करता रात्रीही आपला मुलगा घरी नाही, याची किंचितही चिंता करीत नाहीत. 

पालकांचे मुलांकडे सतत होणारे दुर्लक्ष, केवळ पैसा कमाविण्याचा नाद, जडलेले व्यसन यामुळे पालक मंडळी आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत. परिणामी ती ती वा बालके संघटित गुन्हेगारीकडे वळत आहेत.

गुन्हेगारी जगतात पाय रोवत आहेत विधी संघर्षित बालके शहरातील चोया, मारामाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, गैरकायद्याची मंडळी, छेड़खानी या प्रकरणांत अल्पवयीन बालकांचाही समावेश आहे. अशा अनेक बालकांचर शहरासह जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. खेळण्या-बागडण्याच्या वयात गुन्हेगारी जगतात पाय ठेवणे ही बाब समाजासाठी धोक्याची आहे.

प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना पाहता प्रेम प्रकरणातून शारीरिक हानीचे गुन्हे शहरात घडत आहेत. रामनगर परिसरात असलेल्या चौपाटी परिसरात दोन हे गुन्हे वर्षांआधी जास्त होते. पाहायला मिळत परंतु, आताही प्रेम प्रकर णातून अल्पवयीन मुले मारामारी, खून किंवा खुनाचा प्रयत्न असे गुन्हे करीत आहेत. आपल्या पाल्यांकडे पालकांचे सतत होणारे दुर्लक्ष त्या पाल्यांना गुन्हेगारी जगताकडे नेत आहे.

मैत्री टिकविण्यासाठी संघटित गुन्हेगारीत पाऊलसतत मित्रांच्या सान्निध्यात राहणारे तरुण है मनात येईल तसे वागण्याचा प्रयत्न करतात. त्यातच त्यांच्या मनावर काइम सिरिअल पाहून आपले क्राइम जगतात मोठे नाव करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असल्याचे तपासात काही तरुणांकडून लक्षात आले. गोंदिया शहर छोटे असूनही शहरात अल्पवयीन मुले किंवा तरुण शिक्षणाचा नाद सोडून मैत्री टिकविण्यासाठी संघटित गुन्हेगारीकडे वळत आहेत.

गोंदिया जिल्ह्यात महिनानिहाय झालेले खून तसेच अटक आरोपींची संख्या                         खुनाची संख्या                  आरोपींची संख्या जानेवारी                    ०२                                  ०५    एप्रिल                        ०३                                  १०मे                              ०३                                  ०५जून                           ०६                                  १७जुलै                           ०१                                  ०१ऑगस्ट                      ०२                                 ०४

गोंदियातील खून प्रकरणात दोघे विधी संघर्ष बालक आरोपीशहरातील छोटा गोंदिया परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री घडलेल्या विकास उर्फ विक्की श्रीराम फरकुंडे (वय २१) या तरुणाच्या खून प्रकरणात तीन आरोपींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील दोघे विधी संघर्षित बालक आहेत. याशिवाय, खुनाच्या अन्य घटनांमध्येही विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. शिकण्याच्या वयात ही मुले खून करण्याइतपत धाडस दाखवित असून, ही बाब समाजासाठी नक्कीच गंभीर व मंथन करणारी आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया