विद्यार्थ्यांची भूमिका : पालकांच्या मदतीसाठी घेतला पुढाकारपरसवाडा : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नवेगाव (धापेवाडा) जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.कुरंजेकर यांनी शालेय पोषण आहारात अफरातफर केली. याबद्दल गावकऱ्यांनी शाळा गाठून मुख्याध्यापकाची कान उघाडणी करीत असता मुख्याध्यापकाने नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांना गुन्ह्यात अडकविले. पालकांवर लावलेले गुन्हे परत घ्या तरच शाळेत जाऊ असा पवित्रा या शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला आहे.मुख्याध्यापक कुरंजेकर यांनी शालेय पोषण आहारात अपहार केल्याची माहिती शाळा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बघेले यांनी गावातील नागरिकांना दिली. मुख्याध्यापक जे.पी.कुरंजेकर यांनी पोषण आहाराचे १८ बोरीपैकी पाच बोरी तांदूळ आहार पुरवठा धारक कंत्राटदारालाच गाडीतच विकले. याचा पंचनामा महाशक्ती महिला बचत गट अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मुरलीधर बघेले यांनी केला. यात १ क्विंटल तांदूळ, २७ लिटर तेल, साबण पुस्तीकानुसार कमी आढळले. फक्त १ किलो शिल्लक होते. खाजगी शाळेकडून १० हजार व जून्या शाळेचे कवेलू, फरशी, दरवाजे कुणाला न विचारता वरिष्ठाची परवानगी न घेता १६ हजारात साहित्य विक्री केले. २७ हजार शाळा अनुदान व इतर असे ५० हजार रूपये कोणत्याही कामावर खर्च न करता आपल्या पदाचा तोरा दाखवून पैसे हडपले. विद्यार्र्थ्याना पोषण आहार निकृष्ट मिळत असल्याने विद्यार्थी घरूनच डबा आणतात. पालक सोहनलाल छगन पटले, जगदिश लांजेवार, राजेश मोहनकर, दलीराम पटले, कवळू नेवारे, बुधराम नेवारे, कैलाश ठाकरे, धर्मराज राणे या पालकांशी असभ्य वर्तवणूक केली. सर्व शिक्षकासमोर काही पालकांनी सत्य बाबी सांगीतल्या व रेकार्ड पाहनीनुसार आढळल्या. मुख्याध्यापक पालकांशी अटेलतट्टूपणा करीत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)शाळेत जाण्याचा अधिकार नाही का?पालकांनी शाळेला भेट देणे शासन निर्णयातच आहे. पालक आपल्या मुलांबद्दल शाळेत जाऊन तक्रारी असल्यास वर्ग शिक्षक मुख्याध्यापकाला सांगू शकतात. पण मुख्याध्यापक उलट पालकांविरोधात तक्रार करतात. पालकांनी आपले मुले शाळेत का पाठवावे व विद्यार्थ्यानी या शाळेत कसे शिक्षण घ्यावे, असा विचार अख्या गावाला आहे.प्रत्येक ठिकाणी कुरंजेकर वादग्रस्त मुख्याध्यापक जे.पी.कुरंजेकर ज्याठिकाणी कार्यरत होते. त्या ठिकाणी वादग्रस्तच राहिले. तेढवा, डोंगरगाव या ठिकाणी ही तक्रारी होत्या. त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आले. त्यांनी अपहारामुळे ११ हजार रूपये भरावे लागले. वरीष्ठाचे अभयदान असल्याने कुरंजेकरांना अभय मिळत आहे. पोषण आहार शिजवणाऱ्या महिला संध्या रविंद्र कवरे, अहिल्या कवरे यांच्या कडून पैसे घेतात.
गुन्हे मागे घेतल्याशिवाय शाळेत जाणार नाही
By admin | Published: September 15, 2016 12:32 AM