शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

‘गोवा’ अधिवेशनाच्या नावावर सुटी घेणाऱ्या गुरूजींवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:48 AM

गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन ७,८,९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढले होते. परंतु गुरूजी अधिवेशनासाठी ३ ते १३ फेब्रुवारी असे ११ दिवस सुट्टीवर होते.

ठळक मुद्देपुरावा दिल्याशिवाय वेतन नाही : १५ तारखेला विषय समितीत घेणार ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशन ७,८,९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढले होते. परंतु गुरूजी अधिवेशनासाठी ३ ते १३ फेब्रुवारी असे ११ दिवस सुट्टीवर होते. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल १२०० ते १३०० शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर सुट्टी घेतली. परंतु त्यातील अनेक शिक्षक गोव्याला गेलेच नाही. त्यांचे वेतन कपात करण्याची कार्यवाही जि.प. गोंदिया करणार आहे. त्यासंबधीचा ठराव जि.प.च्या विषय समितीच्या सभेत घेण्यात येणार आहे.शासनाने अधिवेशनासाठी केवळ तीन दिवसांची रजा मंजूर केल्यामुळे अनेक शिक्षक माघारी आले आहेत. गोवा सहलीचा बेत आखलेल्या गुरु जींनी ११ दिवस सुट्या मारल्यामुळे जिल्ह्यातील शाळा वाºयावर होत्या. अधिवेशनाला केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातील मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांसह बरेच मंत्री उपस्थित राहणार असल्यामुळे बºयाच शिक्षकांनी ३ ते १३ फेब्रुवारी अशी रजा घेतली आहे. राज्यभरातील जवळपास पाच लाख शिक्षक रजेवर गेले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील १२०० ते १३०० शिक्षकांचा समावेश आहे. अधिवेशन दोन दिवसांचे असताना शिक्षकांनी १० दिवसांची रजा घेतल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातून, विशेषत: पालकांतून संताप व्यक्त केला जात होता.या अधिवेशनासाठी राज्यभरातील निम्याहून अधिक शिक्षक एकाचवेळी रजेवर गेल्याने शाळा ओस पडल्या होत्या. याबद्दल तक्रारी झाल्यानंतर शिक्षण सचिवांनी याची गंभीर दखल घेत थेट कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे.गोंदिया जिल्ह्यातील १२०० ते १३०० शिक्षकांनी या अधिवेशनाच्या नावावर सुट्टी घेतली. परंतु बहुतांश शिक्षक अधिवेशनाला गेलेच नाही. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत ते दिवस घालवून अधिवेशनाच्या नावावर सुट्टीचे वेतन घेण्याच्या प्रयत्नात असल्याने गोंदिया जिल्हा परिषदेने अधिवेशनात गेल्याचे पुरावे दिल्याशिवाय वेतन मिळणार नाही. असा ठराव विषय समितीत १५ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.असे लागणार पुरावेगोवा येथे अधिवेशनाच्या नावावर रजा घेणारे शिक्षक अधिवेशनाच्या नावावर स्वत:च्या कुटुंबासोबत वेळ घालविल्याचे लक्षात आल्यामुळे ते त्या ठिकाणी गेल्याची तिकीट, मंडपातील फोटो, सेल्फी असे पुरावे सादर केल्यानंतरच त्यांना त्या सुट्यांचे वेतन दिले जाणार आहे. पुरावा न दिल्यास वेतन कपात केले जाणार आहे. काही शिक्षकांनी या महिन्यात नजर चुकीने वेतन काढल्यास त्या सुट्यांचा पैसा पुढच्या महिन्याच्या पगारातून कपात करण्यात येणार आहे.गोवा येथे असलेल्या अधिवेशनाच्या नावावर जिल्ह्यात असलेल्या शिक्षकांपैकी अर्ध्या शिक्षकांनी सुट्टी घेतली. परंतु गोव्याला जाणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी होती. यासंदर्भात माहिती काढल्यावर अनेक शिक्षक अधिवेशनाच्या नावावर घरीच होते. त्यांनी पुरावा सादर केल्याशिवाय सुट्टींचे वेतन मिळणार असा घेण्यात येणार आहे.- रमेश अंबुले, शिक्षण सभापती जि.प. गोंदिया.

टॅग्स :zpजिल्हा परिषद