लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा प्रभाव जीवनावश्यक वस्तूंवर होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने गुरूवारी (दि.११) जिल्ह्यात पेट्रोल पंप बंदचे आवाहन केले होते. याला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला.केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला वाढती महागाई आटोक्यात आणण्याचे व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवश्वासन दिले होते. मात्र वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सत्तारुढ सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.सध्या पेट्रोलचे प्रती लीटर दर ९२.५६ पैसे तर डिझेलचे प्रती लीटर दर ७९.७४ पैसे आहे. तर गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांच्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जीवन जगणे कठीण झाले असून गृहीणींना बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सत्तारुढ सरकार सर्वच आघाड्यांवर फेल ठरले असून दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचा दावा सुध्दा फोल ठरला आहे.सरकारच्या या सर्व धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने गुरुवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील व जिल्ह्यातील बहुतेक पेट्रोलपंप सायंकाळी ५ वाजेपपर्यंत बंद होते.बंदच्या यशस्वीतेसाठी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, महाराष्टÑ प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव व गोंदिया जिल्हा प्रभारी सचिन कटियाल, अशोक चौधरी, प्रकाश रहमतकर, राकेश ठाकूर, जहीर अहमद, संदीप ठाकूर, गौरव वंजारी, शकील मंसूरी, सुनील तिवारी, सुनील भालेराव, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, निर्मला मिश्रा, बलजीतसिंग बग्गा, मनोज पटनायक, जगदीश वासनिक, संदीप रहांगडाले, निकेतन अंबादे, हरिश तुळस्कर, इमरान खान, रोहण रंगारी, सुमित महावत यांनी सहकार्य केले.
पेट्रोल पंप बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:55 PM
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या दरवाढीचा प्रभाव जीवनावश्यक वस्तूंवर होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हा युवक काँग्रेसने गुरूवारी (दि.११) जिल्ह्यात पेट्रोल पंप बंदचे आवाहन केले होते. याला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला.
ठळक मुद्देयुवक काँग्रेसने केले होते आवाहन : वाढत्या महागाईचा निषेध